नांदेड| कंधार तालुक्यातील मसलगा येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त माजी ग्रामविकास अधिकारी दशरथ रामजी पा.वडजे (वय-83) यांचे 24 ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी 4.00 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.


त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी शनिवारी (दि. 25) दुपारी 1 वाजता मसलगा येथे होणार आहे. दैनिक गांवकरीचे जाहिरात व्यवस्थापक भाऊसाहेब वडजे यांचे ते वडील होतं.




