पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी -NNL

नांदेड। इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येत आहे.

याअनुषंगाने भोकर येथे राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फिरत्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून 17 ऑगस्ट रोजी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थित होते.  

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे आवाहन यावेळी करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे, समाज कल्याण निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी, माधव दौंड, अनिल कंधारे व महेश इंगेवाड हे उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button