नांदेड। भारताचे दोन वेळेसचे पंतप्रधान आणी सुविख्यात अर्थशास्त्री दिवंगत डॉ मनमोहनसिंघजी यांना वारिस – ए – लाहौरी खालसा फौज संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. रविवारी सायंकाळी संस्थेचे सर्व ज्येष्ठ सदस्य आणी प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितित श्रद्धांजलि सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ मनमोहनसिंघजी यांच्या विविध क्षेत्राती योगदानाचे संस्मरण करण्यात आले. डॉ मनमोहन सिंघजी यांनी श्री गुरु ग्रन्थसाहिबजी यांचा त्रिशताब्दी गुरुतागद्दी सोहळ्यानिम्मित दिलेल्या भरीव योगदानाचे उल्लेख करण्यात आले. देशात या महामानवाचे स्मारक झाले पाहिजे आणी त्यासाठी राजकारण विरहित निर्णय घेण्यात यावे असे ही सुर छेडण्यात आले.
श्रद्धांजलि कार्यक्रमात स. भगवंतसिंघ हजुरीया, प्राचार्य स. गुरबचनसिंघ, डॉ जुझारसिंघ सिलेदार, वरिष्ठ पत्रकार स. रविंदरसिंघ मोदी, स. भीमसिंघ बेल्थरवाले, स. इंदरजीतसिंघ गडगज यांनी श्रद्धांजलिवर विचार मांडले. तसेच स. जगजीवनसिंघ रिसालदार, स. दिलीपसिंघ रागी, स. राजिंदरसिंघ सिद्धू, स. हरबन्ससिंघ वासरीकर, स. खेमसिंघ पुजारी, हरनामसिंघ मल्होत्रा, स. हुकूमसिंघ कराबीन, विक्रमसिंघ फौजी, स. हरकिशनसिंघ महंत, स. महादीपसिंघ महंत यांनी डॉ मनमोहनसिंघ यांच्या प्रतिमेस श्रद्धासुमन अर्पित केले.