श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठ पैकी पुर्ण व मुळ पिठ असलेले गडावरील रेणुका मातेचे मंदिर,सती अनुसूया माता मंदिर.श्री दत्त शिखर. दत्त प्रभुचे निद्रास्थांन, देवदेवेश्वर.बाबा सोनापीर, पांडव लेणी.शे.फ.वझरा धबधबा. मात्रुतिर्थ .कैलास टेकडी,रामगढ किल्ला.यासह निसर्ग रम्य डोगर द-या,चे ठिकाण असलेल्या माहूरगड भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत.
आठवडाभरांपासून शनिवार, रविवार शासकीय सुट्टी व नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर भाविक व पर्यटकांनी फुलून गेलेली असल्याचे पहावयास मिळत आहे. हा भाविकांचा ओघ नववर्षा आरंभ दिनापर्यंत असाच राहणार आहे. कर्नाटक तेलंगाना सह राज्यभरातून पर्यटक व भाविक भक्त तथा शैक्षणिक सहलीतून आलेल्या विद्यार्थ्यांची माहूर नगरीत प्रचंड गर्दी होत आहे. नाताळ सुट्टीतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर. सध्या दररोज हजारों भाविक दर्शनार्थ येत असल्याने दर्शन मंडप भाविकांनी खच्चून भरुन वाहत आहे.
स. ७ ते सायं. ९ वाजेपर्यंत मंदिरात दर्शनार्थ प्रचंड गर्दी होत आहे. देविच्या दर्शनानंतर भाविक परीसरातील प्रसाद, फोटो खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. भाविकांच्या गर्दीने गड फुलून जात आहे. खाजगी वाहनांची वर्दळ असल्याने गडावरील रस्त्यावर वाहने उभी करावी लागत आहेत. दर्शनार्थ तीन ते चार तास लागत आहेत. थंडी कमी असल्याने भाविकांना काही अंशी दिलासा मिळत आहे. आठवडा भरापासून शहरात सर्वत्र ठिकठिकाणी प्रचंड गर्दी उसळली आहे. शहरातील बसस्थानक चौक, दत्त चौक, टि पॉइंट परिसरातील रस्त्यावर वाहतूक वाढली आहे.
ना पोलीस, ना स्वंयसेवक,ना रेणुका देवी संस्थान चे गार्ड कुणीच नसल्याने पर्यटक व भाविकांची सततच्या वाहतूक कोंडीमुळे डोकेदुखी वाढत आहे. शहरातील लॉज, हॉटेल, धर्मशाळा, भक्त निवास, मंदिर धर्म शाळा पर्यटकांनी खचाखच भरत असल्याचे दिसत आहे. हा भाविकांचा ओघ नववर्ष प्रथम दिनापर्यंत असाच राहणार आहे.