Shrikshetra Mahurgad : भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीने बहरले श्रीक्षेत्र माहूरगड; शनिवार,रविवारसह नाताळ सुटीमुळे भाविकांची मादियाळी -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठ पैकी पुर्ण व मुळ पिठ असलेले गडावरील रेणुका मातेचे मंदिर,सती अनुसूया माता मंदिर.श्री दत्त शिखर. दत्त प्रभुचे निद्रास्थांन, देवदेवेश्वर.बाबा सोनापीर, पांडव लेणी.शे.फ.वझरा धबधबा. मात्रुतिर्थ .कैलास टेकडी,रामगढ किल्ला.यासह निसर्ग रम्य डोगर द-या,चे ठिकाण असलेल्या माहूरगड भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत.
आठवडाभरांपासून शनिवार, रविवार शासकीय सुट्टी व नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर भाविक व पर्यटकांनी फुलून गेलेली असल्याचे पहावयास मिळत आहे. हा भाविकांचा ओघ नववर्षा आरंभ दिनापर्यंत असाच राहणार आहे. कर्नाटक तेलंगाना सह राज्यभरातून पर्यटक व भाविक भक्त तथा शैक्षणिक सहलीतून आलेल्या विद्यार्थ्यांची माहूर नगरीत प्रचंड गर्दी होत आहे. नाताळ सुट्टीतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर. सध्या दररोज हजारों भाविक दर्शनार्थ येत असल्या...
