HomeनांदेडCelebrate Ganeshotsav peacefully : गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलीस निरीक्षक आयलाने.. NNL

Celebrate Ganeshotsav peacefully : गणेशोत्सव शांततेत साजरा करा, पोलीस निरीक्षक आयलाने.. NNL

नवीन नांदेड| गणेशोत्सव शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी गणेश मंडळ पदाधिकारी यांनी सर्तक रहावे तर गावात पोलीस पाटील यांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी केले.

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव निमित्ताने आयोजित ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत नांदेड नायब तहसीलदार डांगे नावामनपाचे सहायक आयुक्त संभाजी कास्टेवाड,अग्निशमन अधिकारी डी.एन.गायकवाड ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अच्युत भातलोंढे,केशव जावळे, डॉ.नरेश रायेवार, वैजनाथ देशमुख, मनपाचे स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल, सौ.सुमनताई खोसडे,सौ.जयश्री संजय इंगळे,प्रविण हंबर्डे,लवकुश अवनुरे,भास्कर बुधदेवार, पांडुरंग हंबर्डे, कृष्णा पगडे, संतोष मोरे,अल्का बोकारे,सौ.खटके, सुनिता गाढे,गोविंद तेलंगे,अरूणा ठोके, शिवाजी सोनटक्के,बालासाहेब सुर्यवंशी, सरपंच दता जाधव,वांगी, सरपंच सटवाजी तारू सिध्दनाथ, निखिलेश देशमुख, संग्राम निलपत्रेवार,रमेश वाघमारे,प्रसेनजित वाघमारे,यांच्या सह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व सामाजिक,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांना श्री मुर्ती स्थापना ते विसर्जन कालवधीत गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी करावयाचे सार्वजनिक कामे ,ऊत्कृष्ट देखावे,यासह अनेक सुचना यावेळी दिल्या, व परवानगी शिवाय एक गाव एक गणपती मंडळ बसविणे ,याबाबत सुचना देण्यात आल्या. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आच्युत भांतलोंढे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांना गणेश विसर्जन मिरवणुकीत वाहन वापर बाबत सुचना देण्यात आल्या, तर मनपाचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी मनपा कडून सुचना देण्यात आल्या, यात कचरा संकलन,तर अग्न्नीशामक दलाच्या वतीने गायकवाड यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडपात आगी बाबत सुरक्षित राहण्या संदर्भात सुचना दिल्या.

यावेळी पो नी आयलाने यांनी गणेश मंडळ पदाधिकारी यांनी वाहनासाठी रस्ता ठेवावा, मिरवणूक दरम्यान वाहतुकीसाठी ही सहकार्य करावे, यासह ग्रामीण भागात एक गाव एक गणपती मंडळ स्थापन करावी , आपल्याला ठरल्या मार्गाने मिरवणूक, डिजे बंदी असल्याने पारंपरिक वाधवृंद वाजावावे अशा सुचना दिल्या व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले, गावात एकोपा राहण्यासाठी एक गाव एक गणपती मंडळ स्थापन करावे असेही आवाहन केले. ऊत्कृष्ट मंडळासाठी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीला उपनिरीक्षक बी.ई.चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले,यांच्या सह प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार, पोलीस पाटील, यांच्यी उपस्थित होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments