Bailpola festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ३७ गावात बैलपोळा सण ऊत्साहात साजरा.. – NNL

नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या ३७ गावात शेतकरी राजाने जल्लोष , व उत्सवामध्ये गावातील हनुमान मंदिरात प्ररदर्शना मारून सामुदायिक लग्न सोहळा व महाआरती करून साजरा करण्यात आला यावेळी गावातील ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,प्रतिष्ठात नागरीक, पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष, यांच्या सह महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बैलपोळा सणाच्या निमित्ताने २ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतअसलेल्या तुप्पा,जवाहरनगर, भायेगाव, वाजेगाव, कांकाडी,नागापूर, राहेगाव, वांगी, पुणेगाव, वाडीपुयड, वसरणी, असरजन,वाघाळा,असदवन,पिंपळगाव ,यासह जवळपास ३७ गावात विधीवत पुजन सामुदायिक लग्न सोहळा,महाआरती ने बैलपोळा सण ऊत्साहात साजरा करण्यात आला.

नांदेड तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक चळवळीत अग्रेसर असलेल्या बाभुळगाव येथे सामुदायिक लग्न सोहळा सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला,यावेळी महाआरती नंतर मानकरी रामदास येडे यांच्या हस्ते तोरण तोडण्यात आले, प्रारंभी गावातील शेतकरी बांधवानी आपल्या सर्जा राजा यांच्यी सजावट करून गावातील हनुमान मंदिरात येथे आणुन प्ररदर्शना घालून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सामुदायिक लग्न सोहळा संपन्न झाला, गावातील महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी सरपंच पुंडलिक मस्के,तंटामुक्त अध्यक्ष सुयभान मोरे,प्रभाकर पाटील मोरे,दक्षिण तालुका शिवसेना प्रमुख अशोक मोरे, पोलीस पाटील संतोष मोरे, मधुकर मस्के ,ग्रामपंचायत सदस्य , गावातील प्रतिष्ठीत नागरीक, मोठया संख्येने उपस्थित होते.

भायेगाव येथे ही ऊत्त्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला, यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, अशोक पाटील कोचार,उपसरपंच बालाजी कोल्हे, विठ्ठल पाटील खोसडे,पोलीस पाटील सुमन खोसडे यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलपोळा सणाच्या निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्या गावनिहाय बंदोबस्त लावण्यात आला, सकाळी आकरा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऊत्त्साहात बैलपोळा सण साजरा झाला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button