नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिला जाणारा ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2024-25’ या वर्षी सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि कथाकार सौ. सुमनताई गणपतराव जिरोनेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दीर्घकालीन साहित्यसेवा, सामाजिक भान आणि ग्रामीण पुनरुत्थानात दिलेल्या अनमोल योगदानाची दखल घेत शासनाने त्यांची निवड केली आहे.


हा पुरस्कार दि. १० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे एका भव्य समारंभात ना एकनाथराव शिंदे ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य ) यांच्या हास्ते तसेच ना संजय शिरसाठ ( सामाजीक न्याय मंत्री ) *मा ना भरतशेठ गोगावले ना.संजय राठोड.

डॉ हर्षवर्धन कांबळे (सचिव सामाजिक न्याय विभाग ) आ. बांगर हिंगोली व मान्यवराच्या उपस्थितीत भव्य दिव्य समारंभात प्रदान करण्यात आला . सौ. सुमनताई जिरोनेकर या केवळ एक प्रतिभावान लेखिका नाहीत, तर त्या ग्रामीण स्त्रीशक्तीचा जिवंत आदर्श आहेत. काव्य, कथा, ललित लेख अशा अनेक साहित्य प्रकारांमधून त्यांनी माणूसपणाचे, नात्यांचे, स्त्रीच्या अंतरंगाचे आणि समाजाच्या विवंचनांचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. त्यांच्या लेखनात मराठी मातीचा गंध आणि संवेदनशीलतेचा गहिरा आशय आहे.

याशिवाय त्या पर्यावरण संरक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि शिक्षण या क्षेत्रांतही कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला आहे. त्यांच्या कार्याला मिळालेली ४०० हून अधिक सन्मानपत्रे आणि अनेक पुरस्कार हे त्याचे जिवंत साक्षीदार आहेत,तसेच त्या मौजे जिरोणा (ता. उमरी, जि. नांदेड) या गावाच्या माजी सरपंच राहिल्या असून, त्यांच्या कार्यकाळात गावाने आदर्श गाव ही उपाधी प्राप्त केली होती.

पुरस्कार मिळाल्याबद्दल खा.डॉ.अजित गोपछडे, आ.हेमंतभाऊ पाटील (कॅबिनेट दर्जा)आ.आनंदराव बोंढारकर,आ. राजेश पवार, आ.अमितगोरखे, आ.आंतापुरकर, माजीआ.घाटे, बाबुराव किडे,मिलिंद व्यवहारे, शंकरराव वानखेडे (नागपूर) माजी समाज भुषण पुरस्कार प्राप्त मान्यवर कावडे,धगाटे तडाख.तसेच ॲड .सुरेंद्र घोडजकर ,प्राचार्य माधव बसवंते, शिवा कांबळे,डॉ बोयाळे, कांबळे, गायकवाड,वाघमारे, तपासकर, सुर्यवंशी, सुर्यकर, बार्टीचे सर्व विद्यार्थी, पोहरे,मिलिंद व्यवहारे, आकाशवाणी च्या सर्व स्टाफ श्रेयश जिरोनेकर, स्नेहा जिरोनेकर, डॉ.गणपतराव जिरोनेकर,नाना पाटील,तसेच हाडोळीकर,बसवंते, गणेश घोबे व मित्रपरिवार, गावकरी, यांनी अभिनंदन केले आहे.
‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ हा केवळ एक पुरस्कार नाही, तर तो समाजातील शोषित-वंचित घटकांना आवाज देणाऱ्या लेखन परंपरेचा गौरव आहे.