Mrs. Sumantai Jironekar ; सौ. सुमनताई जिरोनेकर यांना ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्का
नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिला जाणारा ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2024-25’ या वर्षी सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि कथाकार सौ. सुमनताई गणपतराव जिरोनेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दीर्घकालीन साहित्यसेवा, सामाजिक भान आणि ग्रामीण पुनरुत्थानात दिलेल्या अनमोल योगदानाची दखल घेत शासनाने त्यांची निवड केली आहे.
हा पुरस्कार दि. १० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे एका भव्य समारंभात ना एकनाथराव शिंदे ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य ) यांच्या हास्ते तसेच ना संजय शिरसाठ ( सामाजीक न्याय मंत्री ) *मा ना भरतशेठ गोगावले ना.संजय राठोड.
डॉ हर्षवर्धन कांबळे (सचिव सामाजिक न्याय विभाग ) आ. बांगर हिंगोली व मान्यवराच्या उपस्थितीत भव्य दिव्य समारंभात प्रदान करण्यात आला . सौ. सुमनताई जिरोनेकर या केवळ एक प्रतिभावा...
