लोहा| लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्यातून दोन टीएमसी पाणी आपल्या मतदार संघात अहमदपूर (झरी) येथे नेण्याचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर तयारी केली आहे.


पण या निर्णयास एमआरएस पक्षाचे संस्थापक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी शिक्षण सभापती काँग्रेसचे संजय पाटील कऱ्हाळे व ५० गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. बंधारा बचाव कृती समितीचे अध्यक्ष शिष्टमंडळाने माजी आमदार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. पाणी कोणत्याही परिस्थितीत अहमपूर येथे जाऊ देणार नाही वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावु असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला.

लोहा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर अतेश्वर येथे उच्च बंधारा तत्कालीन आमदार शंकर अण्णा धोंडगे याच्या काळात उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यातून अहमदपूर मतदार संघात झरी येथील तलावात उपसा सिचन द्वारे दोन टीएमसी पाणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील नेणार आहेत. त्यासाठी चार हजार कोटी रुपये निधीची तरतुद आहे. या निर्णयास लोहा-कंधारचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय अंतेश्वर बंधारा बचाव कृती समितीने तीव्र विरोध दर्शविला. माजी आ धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली बंधारा कृती समितीचे अध्यक्ष संजय पाटील क-हाळे, विश्वंभर क्षीरसागर, संदीप पोळ, अजय हंकारे ,माधव चांदणे ,अशोक सोनवळे, चंद्रकांत एकलारे शिष्टमंडळाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे गोमपांवि” महामंडळ विभागाचे अधिकारी संतोष तिरमणवार यांची भेट घेतली.

लोहा तालुक्यातून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी नेण्यासाठी विरोध दर्शवला आहे. ५० गावात या विरोधात तीव्र संताप आहे असे सांगितले शासनाने या निवेदनावर काही कारवाई नाही केल्यास न्यायालयात दाद मागू असे शिष्टमंडळाने बंधारा कृती समितीचे अध्यक्ष संजय पाटील क-हाळे यांनी सांगितले.
