Godavari Irrigation Corporation takes Anteshwar Dam water issue : गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडे अंतेश्वर बंधाऱ्याचा पाणी प्रश्न ; माजी आ धोंडगे न्यायालयात जाणार (?)
लोहा| लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्यातून दोन टीएमसी पाणी आपल्या मतदार संघात अहमदपूर (झरी) येथे नेण्याचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर तयारी केली आहे.
पण या निर्णयास एमआरएस पक्षाचे संस्थापक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी शिक्षण सभापती काँग्रेसचे संजय पाटील कऱ्हाळे व ५० गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. बंधारा बचाव कृती समितीचे अध्यक्ष शिष्टमंडळाने माजी आमदार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. पाणी कोणत्याही परिस्थितीत अहमपूर येथे जाऊ देणार नाही वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावु असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला.
लोहा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर अतेश्वर येथे उच्च बंधारा तत्कालीन आमदार शंकर अण्णा धोंडगे याच्या काळात उभारण्या...
