लोहा| लोहा नगर पालिका क्षेत्रात लिंबोटी धरणातून ६६ कोटी ३९ लक्ष रूपयांची योजना ऑगस्ट २०२३ मध्ये मंजूर झाली संतोष कन्ट्रक्शन अँड इन्फ्रा लि. या कंपनीला ९.८६टक्के जादा दराने दिली. १८महिन्यात ही योजना पूर्ण करणे आवश्यक होते पण अजूनही धरणातून पाईल लाइन अर्ध्यावर आली नाही. तीन पाण्याच्या टाक्या ,दोन फिल्टर, पाणी जनरेट करण्याची प्रकिया ही कामे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे सद्य स्थितीत कामाची गती पाहता आणखी दोन वर्षे शहराला शुद्ध पाण्यासाठी “वेट अँड वॉच करावे लागणार आहे.


एखाद्या शासकीय योजना दीर्घकाळ त्या शहरासाठी उपयुक्त ठरते पण शहरातील जनता जागरूक नसेल तर योजनेचा पर्यायाने शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ होतो. केवळ निवडणूक प्रचार काळात आरोप प्रत्यारोप करून जनतेला भ्रमित करण्या सोबतच काम करणाऱ्या यंत्रणेवर वचक असायला पाहिजे पण हल्ली शहरात तसे होताना दिसत नाह त्यात लिंबोटी धरणातून लोहा शहराला पाणी पुरवठा योजना याचे उदाहरण होय.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान अंतर्गत लोहा नगर पालिकेसाठी पाणीपुरवठा योजना २० जून २०२३ रोजी मंजूर झाली आहे. जलयोजना एकूण ६६ कोटी ३९ लक्ष रुपयाची आहे. यात शासनाकडून रक्कम ५९ कोटी ७५ लक्ष रुपये अनुदान नगर पालिका १० टक्के लोक वाटा म्हणजे ६ कोटी ६३ लक्ष रुपये देणार शिवाय नगर परिषद तसेच देखरेख फिस नियुक्त केलेल्या अभियंता यांना द्यायची आहे. ७ कोटी रूपये कर्ज काढून लोकवाटा भरण्यात येणार आहे.

१८ महिने संपले तरी काम संथगतीने
लोहा शहराची पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास जायचा आणखी किमान दोन वर्षे लागतील (?) असे दिसते. योजनेचे काम वेळेत केले नाही. म्हणून दोन महिन्यापूर्वी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी संबधित गुतेदाराना नोटीस बजवली होतीसंतोष कन्ट्रक्शन व इन्फा प्रा.,ली या कंपनीने पाणी पुरवठा योजना १८ महिन्यात पूर्ण करतो असा करार १५ सप्टेंबर २०२३ रोजी केला पण मुदत जवळपास संपली आहे.
योजना कोट्यावधीची पण पाणी पुरवठा अभियंता नाहीं
शहराला शुद्ध पाणी पुरवठा कधी होणार (?).यासाठी जनता वाट पाहत आहे.६६ कोटीं ३९.लक्ष रुपयांची ही योजना पण त्या कामाची देखरेख करण्यासाठी लोहा नगर परिषदेत पाणी पुरवठा अभियंता नाही .तत्कालीन अभियता श्रीहरी चौडेकर यांनी बदली होऊन दोन वर्षे झाली तरी लोहयाला अजून पाणी पुरवठा अभियंता कोणीच नियुक्त झाले नाहीत. कंधार येथील अभियंता यांची प्रतिनियुक्त आदेश काढण्यात आले ते रुजू होतील असे सांगण्यात आले.

पाणी टाक्या..जलशुद्धीकरण बांधकाम कधी (?)
या योजनेत शहरात व बेनाळ भागात ६ लक्ष लीटर, ५ लक्ष लीटर, व दीड लिटर क्षमतेच्या तीन टाक्या जलशुद्धीकरण तसेच शहराच्या जवळ पोलेवाडी मुख्य जल वाहिनीवर डब्ल्यू टी पी उभारणे अशी कामे आहेत ती अजून सुरूच झाली नाहीत. तालुक्यात काहीं मोठ्या ग्रामपंचायतीत नळयोजनेची कामे याच गुतेदाराकडे आहेत पण ती पूर्णत्वास गेली नाहीत. लोह्याचे नळयोजनेचे काम ज्या गतीने सुरू आहे ते पाहता आणखी दोन वर्षे काम होणार (?). नाही असेच दिसते तेव्हा आमदार प्रतापराव पाटील यांनी या व अन्य कामाच्या अनुषंगाने लक्ष घालावे अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.