नांदेड| महिलांच्या असमानतेचा विषय ठराविक जाती धर्मात नव्हे तर सर्वच जाती धर्मात कमी अधिक प्रमाणात आहे. वार्धक्यातील महिलांच्या आणि खास करून ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या या शहरी भागातील महिलांच्या समस्या पेक्षा अधिक आणि भिन्न आहेत. असे प्रतिपादन सीमावर्ती भागाचे अभ्यासक श्री गोविंद मुंडकर यांनी केले. ते गोदावरी असोसिएशन, नांदेड यांच्या वतीने आयोजित महिला जलतरणपटू पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप, डॉक्टर संदीप आढाव, दिलीप दमकोंडवार, यांची विशेष उपस्थिती होती.


श्री मुंडकर पुढे म्हणाले की, महिलाही बाल्यावस्थेत असताना वडिलांच्या, युवा अवस्थेत पतीच्या आणि वार्धक्याच्या अवस्थेत मुलाच्या धाकाखाली असतानाचे चित्र दिसून येते. शहरात याचे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. अशा कार्यक्रमामुळे मानसिकता बदलून समानतेकडे वाटचाल सुरू आहे. यावेळी जलतरण स्पर्धेतील विजेत्यांना शुभेच्छा देत असतानाच सहभागीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभाग हा सुद्धा विजेतेपदाचे पहिले पाऊल असल्याचे यावेळी स्पष्ट केले. अल्प मानधनात मयूर केंद्रे आणि संघर्ष सोनकांबळे यांच्या परिश्रमाचा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला. समुद्र वीर आणि राज्य पातळीवरील विजेते घडविण्यात येथील प्रशिक्षणाचा मोठा वाटा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पोलीस उपाधीक्षक अश्विनी जगताप म्हणाल्या की महिलांच्या यशामध्ये पुरुषांचा मोठा वाटा आहे.महिला सावित्री असल्यास ज्योतिबा त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे सावित्रीना प्रभावी कार्य करता आले.सावित्रीच्या लेकींना ज्योतिबा विसरता येणार नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्ध जलतरणपटू श्री अरुण किनगावकर यांनी केले. शेखर भावसार यांनी आभार मानले.

राजेश सोनकांबळे,तुकाराम निलेवाड, मधुकर केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आल्या. यात मोठ्या प्रमाणात महिला, युवती आणि किशोरी सहभागी झाल्या होत्या. वंदना सोनकांबळे, रुक्मिणी सोनटक्के, श्रेया सोनटक्के, जिनल बींगेवार, रेवांशू बींगेवार, शेषा देशमुख, श्रीनिधी गुडमलवार,आरोही मोगले, निवृत्ती पिनलवार, आदींना यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एकंदरीत कार्यक्रमासाठी लक्ष्मी व्यंकटेश ज्वेलर्सचे संचालक श्रीयुत दिलीप दमकोंडवार आणि त्यांच्या टीमचे योगदान मोठ्या प्रमाणात होते.
