Water supply from Limbotin Dam for Loha city : लोहा शहरासाठी लिंबोटीं धरणातून पाणीपुरवठा
लोहा| लोहा नगर पालिका क्षेत्रात लिंबोटी धरणातून ६६ कोटी ३९ लक्ष रूपयांची योजना ऑगस्ट २०२३ मध्ये मंजूर झाली संतोष कन्ट्रक्शन अँड इन्फ्रा लि. या कंपनीला ९.८६टक्के जादा दराने दिली. १८महिन्यात ही योजना पूर्ण करणे आवश्यक होते पण अजूनही धरणातून पाईल लाइन अर्ध्यावर आली नाही. तीन पाण्याच्या टाक्या ,दोन फिल्टर, पाणी जनरेट करण्याची प्रकिया ही कामे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे सद्य स्थितीत कामाची गती पाहता आणखी दोन वर्षे शहराला शुद्ध पाण्यासाठी "वेट अँड वॉच करावे लागणार आहे.
एखाद्या शासकीय योजना दीर्घकाळ त्या शहरासाठी उपयुक्त ठरते पण शहरातील जनता जागरूक नसेल तर योजनेचा पर्यायाने शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ होतो. केवळ निवडणूक प्रचार काळात आरोप प्रत्यारोप करून जनतेला भ्रमित करण्या सोबतच काम करणाऱ्या यंत्रणेवर वचक असायला पाहिजे पण हल्ली शहरात तसे होताना दिसत नाह त्यात लिंबोटी धरणातून लोहा शहराला पाणी ...
