HomeनांदेडParmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर जवळगावकर यांनी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या मंदिर कमिटीच्या आजवरच्या कामकाजाच्या छायाचित्र संग्रहाची पाहणी केली.

मंदिर कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांतून केलेल्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. “मंदिर कमिटीच्या पुढाकारामुळे हिमायतनगरच्या वैभवात भर पडली आहे. मंदिराच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास मी सदैव पाठीशी राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत संचालक मंडळाला सहकार्याचे आश्वासन दिले.

IMG20260215133529 01 Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन
oplus_0

या प्रसंगी मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, नगराध्यक्ष रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सभापती जनार्धन ताडेवाड, प्रवीण कोमावार, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, यात्रा सब-कमेटी अध्यक्ष सुभाष शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

IMG20260215141043 01 Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन
oplus_0

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील व्यवस्था, प्रशासनिक कामकाजाची सुलभता आणि भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे मंदिराच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. मंदिर विकासाच्या नव्या टप्प्याची सुरुवात म्हणून या कार्यालय उद्घाटनाकडे पाहिले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments