Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर जवळगावकर यांनी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या मंदिर कमिटीच्या आजवरच्या कामकाजाच्या छायाचित्र संग्रहाची पाहणी केली.
मंदिर कमिटीने विविध धार्मिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रमांतून केलेल्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. “मंदिर कमिटीच्या पुढाकारामुळे हिमायतनगरच्या वैभवात भर पडली आहे. मंदिराच्या विकासासाठी कोणतीही मदत लागल्यास मी सदैव पाठीशी राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत संचालक मंडळाला सहकार्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी मंदिर कमेटी...
