हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील प्रसीध्द श्री परमेश्वर मंदिराच्या महाशिवरात्री यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटच्या कुस्तीची दंगलीला दि.11 मार्च मंगळवारी दुपारी 01 वाजता बालमल्लाच्या संत्र्या मोसंबी कुस्तीने सुरुवात झाली. तसेच महिला कुस्तीपटूनी यात्रेत खळबळ उडवून दिली. यात शेवटची अव्वल नंबरची मानाची कुस्ती वाशीम येथील पैलवान विजय शिंदे याने जिंकुन विदर्भ – मराठवाड्यात कुस्तीचा फड गाजविला आहे. त्याने गाजविलेल्या कुस्ती कौशल्याबद्दल सर्व कुश्ती शौकीनांनी अभीनंदन करुन बजरंग बली कि जय… जय श्रीरामाच्या जयघोषात श्री परमेश्वर मंदिरापर्यंत भव्य मिरवणुक काढली होती.


गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेचा शेवट भारतीय खेळात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धानी झाला. लहान मोठ्या बालकांच्या संस्त्या – मोसंबीच्या कुस्त्याला दुपारी 01 वाजल्यापासुन सुरु झाल्या. त्यात 10, 20, 30, 50,100, 200 रुपयाच्या कुस्त्या सुरु होत्या. शेवटची मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती जीकणा-या पैलवानासाठी 21000 रुपये बक्षीस बजरंग दलाच्या वतीने तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जिंकणाऱ्या पैलवनास 11111 रुपयाचे बक्षीस भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल यांच्या वतीने तर तिसऱ्या क्रमांकाचे 11000 रुपयाचे बक्षीस विकास पाटील देवसरकर यांच्या वतीने, चौथ्या क्रमांकाचे 7000 रुपयाचे बक्षीस लक्ष्मीकांत देशपांडे यांच्यातर्फे पाचव्या क्रमांकाचे बक्षीस 5000 रुपये पत्रकार नागेश शिंदे, सहावे बक्षीस 5000 रुपये सज्जन कदम यांच्या वतीने ठेवण्यात आले होते.

मानाची पहिली कुस्ती विजय शिंदे आणि पठाण या दोघाच्या तुल्यबळ लढतीत संपन्न झाली. हलगीच्या तालावर सुरु असेलल्या कुस्तीच्या फडात वाशिमच्या विजय शिंदे या पैलवानांने प्रतिस्पर्धी पैलवनास चित्त करून अव्वल नंबरचे बक्षीस जिंकले, तर दुसरी मानाची कुस्ती अविनाश कुमार दिल्ली या पैलवानने जिंकली तर बोरगडीचा पैलवान मल्लेश शंनेवाड, सतीश लहानकर यांनी जिंकली. त्यानंतर 2000 रुपयाच्या 10 कुस्त्या, 1001 रुपयाच्या 20 कुस्त्या, तसेच वैयक्तीक कुश्ती शौकीनांनी लावलेल्या 1000 व 500 च्या अश्या मिळुन 100001 रुपयापेक्षा अधीकच्या कुस्त्या तळपत्या उन्हात श्री परमेश्वर मंदिर समीतीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सब कमेटीचे अध्यक्ष सुभाष शींदे, उपाध्यक्ष विठ्ठल ठाकरे, सचीव अनिल भोरे यांच्यासह सर्व संचालक व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडल्या.

यामध्ये पुसद, यवतमाळ, दिल्ली, वाशी, हरियाणा, नांदेड, येथील पैलवान दाखल झाले होते.16 वर्षीय चिमुकलीने 1000 रुपयाच्या दोन कुस्त्या जिंकुन हम..भी किसी से कम नही..असे दाखऊन दिले. कुस्तीच्या रंगतदार फड पाहण्यासाठी हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, उमरखेड, पुसद, तेलंगणा राज्यांसह अन्य दुर-दुरच्या ठिकाणाहुन हजारों पैलवान व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती. मानाची प्रथम कुस्ती पटकावीणा-या पैलवानाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत बॅेडबाज्याच्या गजरात श्री परमेश्वर मंदिरापर्यंन्त भव्य मिरवणुक काढली.

यावेळी मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष श्री महावीरचंदजी श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, कुस्ती समितीचे अध्यक्ष कुणाल राठोड, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, अशोक अनगुलवार, विपुल दंडेवाड, प्रवीण कोमावार, सतीश गोपतवाड, श्याम पाटील, वैभव डांगे, दुर्गेश मांडोजवार, विकास नरवाडे, सितु सेवनकर, निक्कू ठाकूर, रामदास रामदीनवार, माने सोनारीकर, अमोल कोटुरवार यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत विजेत्या मल्लाना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कुस्तीचा फड व यात्रेतील सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक अमोल भगत व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्यामुळे कोणतेही गालबोट न लागता यात्रा उत्सव शांततेत संपन्न झाला. बुधवारी यात्रा उत्सव काळात सहकार्य करणाऱ्या सर्व समित्यांचे पदाधिकारी, मान्यवर, पत्रकार व युवकांचा स्वागत सत्कार करण्यात येऊन यात्रेचा समारोप करण्यात आला.