श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| शहरातील आठवडी बाजारात शहरातील विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेची पैसे व सोने असलेली पर्स बाजार करत असताना खाली पडल्याने ती महिला पत्रकार तथा युवती सेनेच्या तालुका अध्यक्षा सुरेखा तळणकर यांना मिळाली व त्यांनी बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेचा शोध घेवून महिला पोलिसांच्या समक्ष ती पर्स परत केली. महिला पञकार सुरेखा तळणकर यांचा प्रामाणीकपणा पाहून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


माहूर येथे सोमवारी मोठा आठवडी बाजार भरला जातो. या बाजारात हजारोच्या संख्येने महिला पुरुष भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात, यावेळी अनेकांचे पैसे पडणे, पर्स हरवणे या सह इतर घटना घडत असतात असाच काहीसा प्रकार सोमवारी भरणार्या आठवडी बाजारात येथील विश्रामगृहावर स्वयंपाकी म्हणून काम करणारी महिला धनवंता ग्यानदास कुमरे ह्या बाजार करीत असतांना त्यांची पर्स एका दुकानाच्या बाहेर पडली. ती पर्स येथील महिला पत्रकार सुरेखा तळणकर यांना सापडल्याने त्यांनी पर्स हातात घेऊन पर्स उघडून बघितली असता पर्स मध्ये महिलेचे आधार कार्ड होते. त्यावरून बरीच शोधा शोध केली परंतु सदरील महिला मिळून आली नाही.

त्यामुळे बाजार करण्यासाठी आलेल्या महिला पोलीस शिपाई शिवनंदा जाधव आणि स.पो.उ नि सुनील गायकवाड यांच्या पत्नी कोमल गायकवाड यांना सदरील बाब सांगितल्याने त्यांनी पोउपनि शिवप्रकाश मुळे यांना सदरील घटनेची माहिती देऊन त्या तिघींनी मिळून त्या महिलेचा बाजाराचा शोध घेतला. त्या मिळून आल्याने त्यांना जागेवरच पर्स परत करून त्यांचे साहित्य व्यवस्थित आहे की नाही, याची खात्री करण्यात आली.महिला पत्रकार सुरेखा तळणकर तसेच महिला पोलिसांनी सदरील महिलेची पर्स खात्री करून परत केल्याने सपोनि शिवप्रकाश मुळे यांचे सह मान्यवरांनी महिला पत्रकार सुरेखा तळनकर यांचेसह महिला पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
