हिमायतनगर, अनिल मादसवार| महाशिवरात्र महोत्सवातील शंकरपट स्पर्धा अ आणि ड दोन गटात संपन्न झाली. या झालेल्या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील वडधुती येथील अतुल राठोड यांच्या सैराट आणि किनवट तालुक्यातील मुळझरा येथील जगदेराव गायकवाड यांच्या लाडक्या या जोडीने माजी मारली. एकूणच शंकरपट स्पर्धेत सर्व मिळून ३ लाखाच्या बक्षिसाची लयलूट या स्पर्धेत झाली.


आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे ५५,५५५ रुपयांचे पहिले बक्षीस त्यांनी पटकावले असून, मंदिर कमिटीच्या हस्ते बक्षीस व टॉफी देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. ड गटातील २१,१११ रुपयांचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे पहिले बक्षीस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लिहु-सर्ज्या जोडीने पटकावले आहे. बक्षीस वितरण परमेश्वर देवस्थान मंदिरात ८ मार्च रोजी रात्री ८.३० वा उपाध्यक्ष महावीरचंद श्रिश्रीमाळ यांच्या ऊपस्थीत करण्यात आला आहे.

अ गट आणि ड या दोन्ही गटात ७ आणि ८ मार्च रोजी झालेल्या शंकरपट स्पर्धेत उत्स्फूर्तपणे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी दुर दुरुन जोड्या आल्या होत्या. शकरपट पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अ गटात बारा बक्षिसे तर ड गटात सोळा बक्षीसे दात्यानी दिले होते. बक्षीस वितरण त्या त्या बक्षीस दात्याच्या हस्ते मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या बक्षीस वितरण सोहळ्यास देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, आदी पदाधिकारी, यात्रा सब कमिटीचे सुभाष शिंदे, विठ्ठल ठाकरे, शंकरपट स्पर्धा समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष चेअरमन प्रविण शिंदे, सचिव श्यामसुंदर पाटील, राजीव गाजेवार, अभिषेक लुटे, राम नरवाडे, पिंटू चिंतावार, संदीप तुप्तेवार, अरविंद वानखेडे, किरण माने, यांच्या सह कमिटीने परीश्नम घेतले. सोनबा पाटील, संदिप कुंडकर, शाम राठोड यांनी शंकरपट स्पर्धेच्या गुणांचे निरीक्षण केले.
