Friday, May 15

Tag: Sairat – Ladkya won first in Group A

In the Shankarpat competition : शंकरपट स्पर्धेत अ गटात सैराट – लाडक्या प्रथम ड गटात लिहु- सर्ज्याने मारली बाजी

In the Shankarpat competition : शंकरपट स्पर्धेत अ गटात सैराट – लाडक्या प्रथम ड गटात लिहु- सर्ज्याने मारली बाजी

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाशिवरात्र महोत्सवातील शंकरपट स्पर्धा अ आणि ड दोन गटात संपन्न झाली. या झालेल्या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील वडधुती येथील अतुल राठोड यांच्या सैराट आणि किनवट तालुक्यातील मुळझरा येथील जगदेराव गायकवाड यांच्या लाडक्या या जोडीने माजी मारली. एकूणच शंकरपट स्पर्धेत सर्व मिळून ३ लाखाच्या बक्षिसाची लयलूट या स्पर्धेत झाली. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे ५५,५५५ रुपयांचे पहिले बक्षीस त्यांनी पटकावले असून, मंदिर कमिटीच्या हस्ते बक्षीस व टॉफी देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. ड गटातील २१,१११ रुपयांचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे पहिले बक्षीस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लिहु-सर्ज्या जोडीने पटकावले आहे. बक्षीस वितरण परमेश्वर देवस्थान मंदिरात ८ मार्च रोजी रात्री ८.३० वा उपाध्यक्ष महावीरचंद श्रिश्रीमाळ यांच्या ऊपस्थीत करण्यात आला आहे. ...
error: Content is protected !!