Homeक्राईमThe black marketers of ration : संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतला;...

The black marketers of ration : संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतला; रेशनचा काळाबाजार करणारांची झोप उडाली -NNL

नांदेड| ऑफरेशन प्लॅश आउट नुसार अवैद्य कार्यवाही करणेकामी पोलीस अधीक्षक नांदेड यांनी विशेष पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अमंलदार यांना अवैद्य धंदयावर कार्यवाही कार्याचे आदेशीत करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक १० रोजी विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे रेषांचा काळाबाजार करणाऱ्यांची झोप उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिलेल्या आदेशावरुन दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलुर हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून देगलूर ते उदगीर रोडवर मौजे कारेगांव येथे एक आयचर वाहन क्रमांक MH 26 BD 8051 वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात गहु व तांदळाने भरलेले 115 कटटे किमत अंदाजे 1,20,000/- रु चा रेशनचा माल मिळून आला. त्यावरुन सदर ट्रक क्रमांक MH 26 BD 8051 कि. अं. 22,00,000/- रु व ट्रक मध्ये असलेला मुददेमाल किं. अं.1,20,000/- असा एकुण 23,20,000 रु चा माल व ट्रकचालकास ताब्यात घेउन पोलीस स्टेशन देगलूर येथे हजर करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागवुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.

सदरची कार्मागरी अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड, सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनी व्ही.एम. आरसेवार, पोह/605 पोतदार, पोह/335 मुंढकर, पोना 580 तलवारे, पोको 2864 यंगाले पोको 2614 वाघमारे यांनी पार पाडली. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments