The black marketers of ration : संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतला; रेशनचा काळाबाजार करणारांची झोप उडाली -NNL
नांदेड| ऑफरेशन प्लॅश आउट नुसार अवैद्य कार्यवाही करणेकामी पोलीस अधीक्षक नांदेड यांनी विशेष पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अमंलदार यांना अवैद्य धंदयावर कार्यवाही कार्याचे आदेशीत करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक १० रोजी विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे रेषांचा काळाबाजार करणाऱ्यांची झोप उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिलेल्या आदेशावरुन दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलुर हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून देगलूर ते उदगीर रोडवर मौजे कारेगांव येथे एक आयचर वाहन क्रमांक MH 26 BD 8051 वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात गहु व तांदळाने भरलेले 115 कटटे किमत अंदाजे 1,20,000/- रु चा रेशनच...
