wrestling championship in the Shri Parmeshwar Yatra : वाशीमच्या विजय शिंदेने हिमायतनगरातील श्री परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड जिंकला
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील प्रसीध्द श्री परमेश्वर मंदिराच्या महाशिवरात्री यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटच्या कुस्तीची दंगलीला दि.11 मार्च मंगळवारी दुपारी 01 वाजता बालमल्लाच्या संत्र्या मोसंबी कुस्तीने सुरुवात झाली. तसेच महिला कुस्तीपटूनी यात्रेत खळबळ उडवून दिली. यात शेवटची अव्वल नंबरची मानाची कुस्ती वाशीम येथील पैलवान विजय शिंदे याने जिंकुन विदर्भ - मराठवाड्यात कुस्तीचा फड गाजविला आहे. त्याने गाजविलेल्या कुस्ती कौशल्याबद्दल सर्व कुश्ती शौकीनांनी अभीनंदन करुन बजरंग बली कि जय... जय श्रीरामाच्या जयघोषात श्री परमेश्वर मंदिरापर्यंत भव्य मिरवणुक काढली होती.
गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेचा शेवट भारतीय खेळात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धानी झाला. लहान मोठ्या बालकांच्या संस्त्या - मोसंबीच्या कुस्त्याला दुपारी 01 वाजल्यापासुन ...
