Mahesh magar ; अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव यांना तात्काळ हटवा – डॉ.महेश मगर -NNL

नांदेड। येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सध्याच्या प्रभारी कुलसचिव पदाचा कारभार मागील नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून प्रभारी व्यक्तीकडे आहे. ते फार्मसी विभागाचे प्राध्यापक असून त्यांना प्रशासनाचा अनुभव शून्य आहे.

मागील नऊ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी दखलपात्र एकही काम केलेले नसून जास्तीत जास्त कामे हे लाल फितीत अडकवलेले आहेत. अशा विविध आरोपांसह प्रभारी कुलसचिव यांना पदावरून तात्काळ हटविण्याची मागणी निवेदनाव्दारे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.महेश मगर यांनी कुलगुरू यांच्याकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठ कायदा 2016 अन्वये परिनियम 14 मुद्दा क्रमांक पाच नुसार कोणत्याही व्यक्तीला प्रभारी पदाचा कारभार हा सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी करिता उपभोगता येत नाही असे नमूद केलेले आहे. परंतु हे कुलसचिव नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अकार्यक्षमपणे विद्यापीठाचा कारभार हाकलत आहेत.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी घेतलेल्या निर्णयानुसार कारवाई करणे हे सदस्य सचिव म्हणून कुलसचिवांची जबाबदारी असते. परंतु यांनी प्राधिकरणाच्या निर्णयावर कारवाई करण्याचे वारंवार टाळले व ते सिद्ध झाले आहे. चुकीचे उत्तर देणे दिशाभूल करणाऱ्या अधिकारी वर कारवाई न करणे, गैरकारभार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणे अशा पद्धतीचा कारभार हे कुलसचिव करीत आहेत. तसेच इतरही अनेक प्रकरणाची माहिती कुलगुरू दिलेली आहे.

याबाबत माननीय कुलगुरू महोदय आपल्याकडे वारंवार तक्रार केलेली असून कोणाच्या दबावाखाली हा अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव कामे करत असून हा फक्त सांगकाम्या आणि बाहुली बनलेला आहे. अशा व्यक्तीला प्रशासन पदावरून काढू शकत नाहीत ही खेदाने बाब नमूद करावी वाटते. दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या अधिसभा बैठकीत त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी व त्यांना तातडीने पद मुक्त करण्यात यावे अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. महेश आनंदराव मगर यांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button