Mahesh magar ; अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव यांना तात्काळ हटवा – डॉ.महेश मगर -NNL
नांदेड। येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सध्याच्या प्रभारी कुलसचिव पदाचा कारभार मागील नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून प्रभारी व्यक्तीकडे आहे. ते फार्मसी विभागाचे प्राध्यापक असून त्यांना प्रशासनाचा अनुभव शून्य आहे.
मागील नऊ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी दखलपात्र एकही काम केलेले नसून जास्तीत जास्त कामे हे लाल फितीत अडकवलेले आहेत. अशा विविध आरोपांसह प्रभारी कुलसचिव यांना पदावरून तात्काळ हटविण्याची मागणी निवेदनाव्दारे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.महेश मगर यांनी कुलगुरू यांच्याकडे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठ कायदा 2016 अन्वये परिनियम 14 मुद्दा क्रमांक पाच नुसार कोणत्याही व्यक्तीला प्रभारी पदाचा कारभार हा सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी करिता उपभोगता येत नाही असे नमूद केलेले आहे. परंतु हे कुलसचिव नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अकार्यक्षमपणे...
