HomeनांदेडMunicipal Council : धर्माबाद नगरपरिषद निवडणूक; इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ...

Municipal Council : धर्माबाद नगरपरिषद निवडणूक; इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ दखल

नांदेड| धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून सदर मतदान प्रक्रिये दरम्यान प्रसारमाध्यमांकडून धर्माबाद येथील इनानी मंगल कार्यालय येथे मतदारांना कोंडले असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

सदरील बातमीच्या अनुषंगाने धर्माबाद येथील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुरेखा स्वामी व पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी केली असून, संबंधित मंगल कार्यालय मालकावर जमावबंदी व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत फौजदारी कार्यवाही करण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी धर्माबाद श्रीमती सुरेखा स्वामी यांनी कळविले आहे,अशी माहिती नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments