श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभाग मुंबई यांचे कडून आयोजित विभागीय स्तरावर पारपडलेल्या क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायतला ( Mahur Nagar Panchayat) दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदक जिंकले आहेत.

महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभाग मुंबई यांचे कडून आयोजित विभागीय स्तरावर पारपडलेल्या क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजी नगर विभागातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायत कडून प्रतिनिधित्व करताना न.पं.माहूर येथे करनिर्धारक व प्रशासकीय सेवा या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती बबनराव गुव्हाडे यांनी 3 की.मी. वॉकिंग स्पर्धेत सुवर्णपदक, समुह गित गायन स्पर्धेत सुवर्ण पदक, थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक, तर गोळा फेकस्पर्धेत रौप्यपदक , असे एकूण ४ पदके मिळवत माहूर नगर पंचायत च्या नावे रेकार्ड तयार केले आहे.

या कामगिरी बद्दल नगरपंचायत माहूर येथील कार्यक्रमात नगराध्यक्ष फीरोज दोसाणी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, मुख्याधिकारी विवेक कांदे व कार्यालय अधिक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी यांचेसह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या यशाबद्दल स्वाती गुव्हाडे यांचा सत्कार केला.

यावेळी मान्यवरासह लेखापाल व लेखापरीक्षक विशाल मरेवाड,स.कार्यालय अधिक्षक संदिप गजलवाड, इंजिनिअर विशाल ढोरे,स.प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे,शहर समन्वयक शेख मजहर, गुंठेवारी विभागाचे विजय शिंदे, स्वच्छता विभाग प्रमुख गणेश जाधव,पाणी पट्टी वसुली प्रमुख कल्याण पाटील, मालमत्ता कर विभाग प्रमुख सुरेंद्र पांडे,शेख नयुम, विलास बोरकर,अवि बरडे, समाधान, सादिकभाई, प्रविन शेंडे,ज्योती नलावडे,शकीला बी व ईतर कर्मचारी उपस्थित होते.
