श्रीक्षेत्र माहूर| सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत सुरू असलेली अनुसूचित जाती मुलीची शासकीय निवासी शाळा माहूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Snehamelan) शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड, यांच्या मार्गदर्शनाखाली दि २४ जानेवारी रोजी संपन्न झाला.

यावेळी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन जोशी मुख्याध्यापक होते, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनोज कीर्तने, विलास भंडारे, राज ठाकूर, नितेश बनसोडे, देवानंद कांबळे, श्रीमती नम्रता कीर्तने, श्रीमती ढवळे , अविनाश टनमने, भाग्यवान भवरे, एकनाथ मानकर, यशवंत साबळे, हे मान्यवर उपस्थित होते, यावेळी ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी व आदिवासी बंजारा व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव, नाटिका व नृत्य सादर करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांचे आई-वडील मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डोंगरे मॅडम यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती कापसे , श्रीमती लसनते , श्रीमती भवरे मॅडम, श्री शिंदे, चव्हाण, राठोड, आंदे , भवरे यांनी प्रयत्न केले, कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन श्री इंगोले यांनी केले,
