Thursday, May 14

Search Missing young man । मेडिकल नौकरीच्या शोधासाठी गेलेला तरुण बेपत्ता, पोलिसांनी जारी केली शोधपत्रिका -NNL

नांदेड। जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात मिसिंग क्र. २८/२०२४ मधील बेपत्ता युवक ऋषिकेश सुधाकर मोरे वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा. रिठा ता. भोकर हा घरून मेडिकल नौकरीच्या शोधत जात असल्याचे सांगून गेला तो 25 दिवस झाले परत आला नाही, याबाबत नातेवाईकांनी बेपत्ता युवकाचा शोध लावण्याची मागणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे. त्यानंतर भोकर ठाण्याचे एस.आय.देवकांबळे ASI यांनी शोधपत्रिका जारी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस स्टेशन डायरीत मिसिंग क्र. २८/२०२४ रोजी बेपत्ता युवकाचे वडील सुधाकर दिंगाबर मोरे वय ५० वर्ष व्यवसाय शेती रा. रिठा ता. भोकर.मो.नं. ७७२००७८९९२.यांनी खबर दिली की, त्यांचा मुलगा ऋषिकेश सुधाकर मोरे वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा.रिठा ता. भोकर दिनांक. ३०/०६/२०२४ रोजी रविवार सकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास नांदेड येथे मेडीकलची नौकरीचे शोधण्यासाठी जातो. म्हणुन घरातुन निघुन गेला परंतु तो आजपर्यंत फोन किंवा प्रत्यक्ष संपर्क झालेला नाही. तेव्हा पासुन आज पावेतो त्याचा फोन बंद आहे.

त्यामुळे मुलाची चौकशी आम्ही आमचे नातेवाईकाकडे व त्यांचे मित्राकडे केली असता तो मिळून आलेला नाही. त्यांचेकडे मोबाईल असुन त्यांचा न.७३७८३७७१०६ असा आहे. असे दिलेल्या तक्रारीत म्हंटले असून, माझा मुलगा ऋषिकेश यांचा पोलीसामार्फती शोध घेऊन आमच्याकडे सोपविण्यात यावे अशी विनंती करणारी तक्रार दि.०७/०७/ २०२४ रोजी भोकर पो.स्टे. स्टेशनला लेखी दिली आहे. यावरून पोलिस ठाणे अंमलदार यांनी नौकरीच्या शोधात गेलेल्या युवकांच्या संदर्भात मिसिंग दाखल केली आहे.

पोलिसांनी जारी केलेली शोधपत्रिका खालील प्रमाणे…
४) इसम नांव :- ऋषिकेश पि. सुधाकर मोरे वय २३ वर्ष धंदा शिक्षण रा.रिठा ता. भोकर
१) रंग – गोरा,
२) उंची १६० से.मी.
३) बांधा – मजबुत,
४) अंगातील पोषाख- निळे जिन्स पॅन्ट व निळे शर्ट,
५) शिक्षण – बी. फॉर्म
६) भाषा – मराठी, हिंदी
६) खुलासा :- वरील वर्णनाचा मुलगा हा दिनांक. ३०/०६/२०२४ रोजी रविवार सकाळी ०८:०० वा.चे सुमारास नांदेड येथे मेडीकलची नौकरीचे शोधण्यासाठी जातो. म्हणुन घरातुन निघुन गेला परंतु तो आज पावेतो घरी आला नाही. तरी या वर्णनाचा मुलाचा कुणास आढळून आल्यास त्यांनी पोलीस स्टेशन भोकर येथे संपर्क साधावा, संपर्क फोननंबर ०२४६७-२२२६२३ पोलीस स्टेशन भोकर, तपासिक अंमलदार एस.आय. देवकांबळे मो.क्र.९६२३९७९९८१ यावर कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!