HomeलेखCeo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास-...

Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मिलिंद व्यवहारे यांचा लेख.

नांदेड जिल्‍हा परिषद ही समग्र ग्रामीण विकासाचा केंद्रबिुंदू आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आखून दिलेल्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम करतात आणि कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे.

मिनल करनवाल ह्या 2018 साली आयएएस झाल्‍या. त्‍यांनी देशात 35 वा रँक मिळविला. देहरादून उत्‍तराखंडमध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांनी प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ अकादमीमधून पूर्ण केले. दिल्‍ली येथील सेंट स्‍टीफन्‍स कॉलेज मधून बी.ए. केले. त्‍यानंतर दिल्‍ली येथून आयएएस हाऊन त्‍या प्रशासनात आल्‍या. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासनात मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून मीनल करनवाल ह्या 22 जुलै 2023 रोजी दाखल झाल्या. आज त्यांना एक वर्ष पूर्ण झाली आहेत. त्‍यानी आपल्‍या बहुआयामी व्यक्तिमत्वने प्रशासनात स्वतंत्र ठसा उमटवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा परिषदेकडून विविध महत्त्वपूर्ण योजनेमध्ये कार्यक्षमता वाढवली आहे. शाळा सुधारणा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आणि सामाज कल्याण योजनांच्या कार्यान्वयनात त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे.

त्यांच्या कार्यकालात प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. आगामी काळात जिल्हा परिषदेला आणखी उंचीवर नेण्यासाठी सीईओ मीनल करनवाल यांनी विविध योजनांची आखणी केली आहे. किनवट व माहूर तालुक्यातील गरोदर माता, स्तनदा माता यांना अमृत आहार योजनेतून सकस आहाराचा पुरवठा, महिला सक्षमीकरण, सुपोषणासाठी प्रोटीन युक्त आहार, शालेय विद्यार्थ्यांना कोडींगचे प्रशिक्षण, प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी, शाश्वत स्वच्छता, ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यावर भर असेल.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या यशस्वी कार्यकालाचे आणि उत्कृष्ट नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या समर्पणाने आणि कार्यक्षमतेने सीईओ मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेला नव्या उंचीवर नेले आहे. आगामी काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद यशस्वी आणि प्रभावी ठरेल, अशी आशा आहे. त्यांच्या पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा!

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments