Homeनांदेडentrance examination ; नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे...

entrance examination ; नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष 

नांदेड l राष्ट्रीय परीक्षा एजेंसी नवी दिल्ली मार्फत आयोजीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात आयोजीत करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकुण 56 केंद्र नियोजीत असून त्यापैकी नांदेड शहरात 46 केंद्र, मुदखेड तालुक्यात 4 केंद्र, नायगाव तालुक्यात 4 केंद्र व बिलोली तालुक्यात 2 केंद्रावर ही परीक्षा रविवार 4 मे 2025 रोजी नियोजीत आहे. नीट (UG) प्रवेश परीक्षाकरीता पात्र उमेदवारांनी रविवार 4 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यत पोहचण्याचे प्रयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले नांदेड यांनी केले आहे.

परिक्षार्थी मार्फत कुठल्याही गैर मार्गांचा अवलंब परीक्षा काळात होऊ नये. जसे ईलेक्ट्रोनीक उपकरणांचा, ब्लुटूथचा वापर आळा बसणे अनुषंगाने परिक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कान, नाक, घसा संबंधाने तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये पुढील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे. उमेदवाराने आणलेल्या कोणत्याही वस्तूच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा केंद्र जबाबदार नसेल. मजकूर साहित्य (मुद्रित किंवा लिखित), कागदाचे तुकडे, भूमिती/पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाउच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखनपॅड, पेनड्राइव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉगटेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तु उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आणू नयेत.

नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा केंद्रावर ड्रेसकोड संदर्भाने दिलेले निर्देशांचे तंतोतंत पालन करणे परिक्षार्थी यांना क्रमप्राप्त आहे. जसे वजनाने भारी असलेला पोषाख, फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधीत असून सांस्कृतिक व पारंपारीक पोषाखासंदर्भाने तपासणी (फ्रिसकींग) संदर्भाने, परिक्षेच्या दिवशी सकाळी 11.30 वाजेच्या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी करुन घ्यावी. मोबाईल फोन, ब्लूटूथ, इअरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड इ. सारखे कोणतेही संप्रेषण साधन परीक्षा केंद्रावर आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच इतर वस्तू जसे वॉलेट, गॉगल, हँडबॅग, बेल्ट, कॅप इत्यादी कोणतेही घड्याळ, मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ. कोणतेही दागिने, कोणताही खाण्यायोग्य पदार्थ उघडलेला किंवा पॅक केलेला इत्यादी, तसेच कोणत्याही लपवून आणण्या जोग्या मायक्रोचिप, कॅमेरा, ब्लूटूथ उपकरण इत्यादी संप्रेषण साधने, इतर कोणतीही वस्तू जी अनुचित साधनांसाठी वापरली जाऊ शकतात, त्या सर्व प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत.

जर कोणत्याही उमेदवाराकडे, परीक्षा केंद्रात नमुद प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल आणि कायद्यान्वये संबंधित तरतुदींनुसार उमेदवारावर कारवाई केली जाईल, याची सर्व परिक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments