Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मिलिंद व्यवहारे यांचा लेख.
नांदेड जिल्हा परिषद ही समग्र ग्रामीण विकासाचा केंद्रबिुंदू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आखून दिलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम करतात आणि कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे.
मिनल करनवाल ह्या 2018 साली आयएएस झाल्या. त्यांनी देशात 35 वा रँक मिळविला. देहरादून उत्तराखंडमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ अकादमीमधून पूर्ण केले. दिल्ली येथील ...
