Homeनांदेडविविध गुन्हे करणारे व अग्नीशस्त्र वाळगणा-या आरोपीस अटक करुन 2,05,000/- रुपयाचा मुद्येमाल...

विविध गुन्हे करणारे व अग्नीशस्त्र वाळगणा-या आरोपीस अटक करुन 2,05,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त -NNL

नांदेड| शहर व नांदेड जिल्ह्यात विविध गुन्हे करणारे व अग्नीशस्त्र वाळगणा-या आरोपीस अटक करुन कारवाही करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आरोपीना अटक करून त्यांच्याकडून 2,05,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे.

अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी पाहिजे, फरारी व माला विषयी गुन्हे करणारे तसेच अग्नीशस्त्र वाळगणारे आरोपीतांचा शोध घेवुन (Operation Flush Out) अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकों/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, असे पोलीस उप विभाग इतवारा हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेत असताना यांनी दिनांक 28/08/2024 रोजी दुपारचे सुमारास कोठा ते वजिराबादकडे जाणाऱ्या बाजुला कौठा नांदेड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून आरोपी नाम शेख अमेर ऊर्फ AD शेख पाशा वय 27 वर्ष व्यवसाय बेकार रा. फारुख मस्जिद जवळ, फारुखनगर नांदेड यास ताव्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताव्यातुन विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले एक गावठी पिस्टल व सोन्याचे दागिने किमती 2,05,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 784/2024 कलम 3/25, 7/25 शस्त्र अधिनियम कायदयाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात

आला असुन पुढील तपास पोउपनि श्री महेश गायकवाड करीत आहेत. सदर आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता मागिल तीन ते चार महिन्यापुर्वी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामणि हद्यीत गोपालचावडी नांदेड येथे चोरी केले असल्याची सांगितले आहे. यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण अभिलेखावर माहिती घेतली असता पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण गुरन 398/2024 कलम 457,380 भादवि, कायदया प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे मिळुन आले. रादर आरोपी हा पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण, शिवजी नगर, विमानतळ येथे पाहिजे फरारी मध्ये असल्याचे समजले आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा.श्रीर. सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी कार्यालय कार्यालय इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष वेल्लुरोड, श्रीराम दासरे, यांनी पार पाडली असुन वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments