Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

IMG 20260215 WA0001 Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

नवीन नांदेड l महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रात्री अभिषेक झाल्यानंतर भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार असून गावात विविध ठिकाणी चहा पाणी फराळ व भाविक भक्तांचा स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संघटना यांच्या कडून स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय कडून दिवा बती, रस्ता स्वच्छता करण्यात आली आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने रात्री 12 वाजता मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खा.भास्कराव पाटील खतगावकर व‌ समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन महाअभिषेक व महाआरती झाल्यानंतर रात्री पासून श्रीकाळेश्वर दर्शन साठी भाविक भक्तांना सोडण्यात येणार आहे.

महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन 9 ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले असून दैनंदिन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 16 फेब्रुवारी रोजी हभप राम महाराज सुगावकर यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी नांदेड येथे दि.9 फेब्रुवारी सोमवार ते 16 फेब्रुवारी पर्यंत ह.भ.प. राजेजी महाराज, हनुमान मंदिर पुजारी, विष्णुपूरी यांच्या कृपाशिर्वादाने तसेच ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या मार्गदर्शना खाली अस्खंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा आयोजित केलेला आहे.

सांगता 16 फेब्रुवारी सोमवार काळेश्वर मंदिर पुजारी श्री गणेश महाराज ढणमने ह.भ.प. राम महाराज, वडेपुरीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे,या सप्ताहाचे नियोजन उध्दव नामदेवराव हंबर्डे, विष्णुपूरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. ह.भ.प. निवृत्तीनाथ म पांगरेकर,ह.भ.प. सुधीर महाराज प ह.भ.प. राम महाराज सुगावकर यांचे काल्याचे किर्तन दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दहा होणार आहे.

दि. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त रात्री12 वा अध्यक्ष, काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या हस्ते श्री काळेश्वर भगवानाचा महाअभिषेक होईल. ग्रामपंचायत कार्यालय विष्णुपुरी सरपंच सौ.संध्याताई विलास हंबर्डे ,ऊपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे व‌ सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी संजय कानोडे यांच्या वतीने गावात महाशिवरात्री निमित्ताने साफसफाई, दिवाबत्ती , रस्ते यासह सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. महाशिवरात्री निमित्ताने भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त समिती व समस्त गावकरी मंडळी, विष्णुपरी, ता. जि. नांदेड यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top