Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था
नवीन नांदेड l महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रात्री अभिषेक झाल्यानंतर भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार असून गावात विविध ठिकाणी चहा पाणी फराळ व भाविक भक्तांचा स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संघटना यांच्या कडून स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय कडून दिवा बती, रस्ता स्वच्छता करण्यात आली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने रात्री 12 वाजता मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी खा.भास्कराव पाटील खतगावकर व समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन महाअभिषेक व महाआरती झाल्यानंतर रात्री पासून श्रीकाळेश्वर दर्शन साठी भाविक भक्तांना सोडण्यात येणार आहे.
महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन 9 ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले ...



