देगलूर, गंगाधर मठवाले। पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देगलूर येथे आयोजित पोलीस व पत्रकारांचा सन्मान आणि कार्यालय उद्घाटन सोहळ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (Sp. Abinash Kumar) यांनी पोलिस व पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भाष्य केले.

ते म्हणाले “पोलिस आणि पत्रकार हे समाजाचे आधारस्तंभ असून, सत्य आणि न्यायासाठी दोघांचेही समान उद्दिष्ट आहे. त्यामुळे परस्पर आदर आणि सहकार्य राखणे अत्यावश्यक आहे. फक्त हंगामा निर्माण करण्याऐवजी सकारात्मक बदल घडवणारी पत्रकारिता करणे महत्त्वाचे आहे.

कार्यक्रमात पोलिस व पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. यात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात सेवानिवृत्त वाहतूक पोलिस शेख अब्दुल अमीर यांना आदर्श पोलिस पुरस्कार, “देगलूर शहर स्वच्छतेचा जागर” ग्रुपला आदर्श पर्यावरण मित्र पुरस्कार, स्व. प्रशांत माळगे (मरणोत्तर) आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशपांडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी कार्यालय उद्घाटन अबिनाश कुमार व संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी संकेत गोसावी उप वि. पो. अ., पो. नि. मारूती मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, लक्ष्मीकांत पदमवार, डॉ. पूजा सचिन गायकवाड संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद वाघमारे आणि आभार प्रदर्शन गजानन टेकाळे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख असलम (तालुकाध्यक्ष), अमित पाटील (उपाध्यक्ष), मिलिंद वाघमारे (सचिव), धनाजी देशमुख (कार्याध्यक्ष), तौहिद काझी (कोषाध्यक्ष), गजानन टेकाळे (संघटक), मनोज बिरादार (सहसचिव), धनाजी जोशी (प्रसिद्धीप्रमुख), गजानन शिंदे (सहकोषाध्यक्ष) उबेद हबीब (सदस्य), किरण सोनकांबळे (सदस्य), सय्यद समी, सुजित सूर्यवंशी, अफान शेख, सचिव कुंभारे आदींनी परिश्रम घेतले.