श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। राज्याच्या पर्यावरण व पशु संवर्धनमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दि. २० जानेवारी रोजी साय ५ वा देव दर्शन दौऱ्याच्या निमित्यांने माहूर दौऱ्यावर होत्या.

मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर प्रथमच माहूर दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी शहरातील टी पॉइंट येथे फटाक्याच्या आतषबाजी करीत व जेसीबी ने फुले उधळून भव्य स्वागत केले. त्यांनी दत्तशिखर येथे दत्तप्रभूचे दर्शन घेतले व कुलदेवता रेणुकामातेच्या मंदिरात महाआरती करून ओटी भरली व रेणुकामातेचे मनोभावे दर्शन घेतले संस्थानच्या वतीने विश्वस्थ संजय काण्णव, दुर्गादास भोपी, अरविंद देव यांनी स्वागत केले.

यावेळी आ. भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव, , प्राचार्य माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, गोपू (सागर)महामुने नगरसेवक, भाजयुमो तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, अनिलजी वाघमारे,तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, संजय राठोड, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, रामेश्वर मुसळे, रामकिसन केंद्रे, आदीसह अनेक समर्थक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
