नवीन नांदेड l शाळा महाविद्यालयांचे प्रतिवर्षी होणारे वार्षिक स्नेहसंमेलने विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते. संगीत, अभिनय, नृत्य, लिखाण आणि क्रीडा अशा विविध प्रकारच्या कलागुणांना स्नेहसंमेलनातून मंच मिळत असतो.

शिक्षण संपल्यानंतर पुन्हा अशी संधी विद्यार्थ्यांना कधी मिळत नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून आपल्या विविध कलागुणांना उजागर करीत कृतिशील विद्यार्थी बनण्याचा निर्धार केला पाहिजे, असे प्रतिपादन वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले.

वसरणी येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात आज पासून वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी उद्घाटकीय भाषणात प्राचार्य डॉ. घुंगरवार बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉ.व्ही.आर.राठोड,प्रो.डॉ.रेणुका मोरे, प्रो.डॉ.नागेश कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्हीं.एम.देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. साहेबराव मोरे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.विजय मोरे, कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे वार्षिक स्नेहसंमेलन ५ दिवसांपर्यंत चालणार आहे.यामध्ये सुरुवातीला आज क्रीडा स्पर्धेत १०० मी. व २०० मी. धावणे, गोळा फेक, थाली फेक,
मुला – मुलींची संगीत खुर्ची व अशा अनेक मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.
हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय योजना विभाग तसेच महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व अनेक विद्यार्थ्यां परिश्रम घेत आहेत.