Homeकृषीonline farmer registration started : मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु...

online farmer registration started : मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु -NNL

नांदेड| केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी 20 खरेदी केंद्र निश्चित केले आहेत. तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केद्रावर आणण्यापूर्वी आर्द्रताचे प्रमाण 12 टक्केपर्यतच असावे व सोयाबीन एफएक्यु दर्जाचा असावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झालेली आहे. मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पन्न बाजार समिती, किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडीत दीनदयाळ उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, मष्णेश्वर फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. धनज ता. मुखेड, सिद्राम फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. बेटमोगरा ता. मुखेड, किनवट तालुका कृषिमाल प्रक्रीया सह. संस्था गणेशपूर ता. किनवट, तिरुपती शहापूर फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. वन्नाळी ता. देगलूर, राधामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी रातोळी ता. नायगाव, अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा ता. हदगाव,

श्रीजगदंब फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. जांब बु. ता. मुखेड, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह खरेदी विक्री संस्था नांदेड ता. अर्धापूर, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी ता. बिलोली, बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सहसंस्था मुखेड बेरली खुर्द ता. मुखेड, मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहसंस्था उमरदरी ता. मुखेड , जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था कौठा ता. कंधार, नांदेड प्रगती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी चेनापूर ता. धर्माबाद, स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्या शेळगावथडी ता. धर्माबाद याठिकाणी मार्केटीग फेडरेशनमार्फत मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झालेली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments