Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Kankadi ; कांकाडी येथील सत्त्याई देवीच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त तिन‌ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन – NNL

Kankadi ; कांकाडी येथील सत्त्याई देवीच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त तिन‌ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l श्री सत्याई देवीची त्रैवार्षिक यात्रा महोत्सव-2025 काकांडी ता. जि. नांदेड येथे दि 14 जानेवारी दि.16जानेवारी 25 दरम्यान आयोजित करण्यात आली असून यात्रे दरम्यान 14 जानेवारी रोजी महाअभिषेक, पारंपरिक पुजा 15 जानेवारी हभप संत समाधान महाराज यांचे हरि किर्तन, देवी भक्तांचा डाक व जागरण,हभप संत अनंता बद्रीनाथ महाराज तनपुरे पंढरपूर यांचे हरि किर्तन व 16 जानेवारी रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या काकांडी येथील सत्याई देवीच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त 14 ते 16 जानेवारी 25 या कालावधीत मोठ्या उत्साहाने सुरू होत आहे. श्री सत्त्याई देवीस पूर्वी बोकड बळी देण्याची अनिष्ट परंपरा व श्रध्दा होती वै. कर्मयोगी श्री संत गाडगेबाचा यांच्या प्रेरणेने व वै.ह.भ.प.श्री संत तनपुरे बाबा पंढरपूरकर यांच्या प्रयत...
Sant Samagam place : महाराष्ट्राच्या ५८ व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी; संत समागम स्थळी निष्काम सेवां -NNL

Sant Samagam place : महाराष्ट्राच्या ५८ व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी; संत समागम स्थळी निष्काम सेवां -NNL

धार्मिक
पुणे/पिंपरी| महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२५ ला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात मिलिट्री डेरी फार्म, शास्त्री नगर, पिंपरी हाऊसच्या जवळ, पिंपरी, पुणे (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानावर केले जात आहे. हा विशाल आध्यात्मिक संत समागम यशस्वी करण्यासाठी २५ डिसेंबर, २०२४ रोजी विधिवत रूपात स्वैच्छिक सेवांचा शुभारंभ झालेला आहे. तेव्हापासूनच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे सदस्य, स्वयंसेवक व भाविक भक्तगण मोठ्या तन्मयतेने, निष्ठेने आणि निष्काम भावनेने समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीमध्ये आपले योगदान देत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि भक्ति व सेवाभावनेच्या इतिहासाची महान परंपर...
Mla. Baburao Kadam Kohlikar : कारला गावातील अखंड हरिनामाची सुरू असलेली सांप्रदायिक परंपरा आदर्शवत – आ.बाबुराव कदम कोहळीकर -NNL

Mla. Baburao Kadam Kohlikar : कारला गावातील अखंड हरिनामाची सुरू असलेली सांप्रदायिक परंपरा आदर्शवत – आ.बाबुराव कदम कोहळीकर -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर| अखंड हरिनाम सप्ताह च्या माध्यमातून आजची नवतरुण पिढी सांप्रदायाकडे जात आहे. कारला गावात श्री कृष्ण मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. गोपाळ मंडळीसह ग्रामस्थांनी हि परंपरा जोपासण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. हि परंपरा कायम सुरू ठेवल्यास भविष्यातील पिढी सुधारल्यासिवाय राहणार नाही. गावची हि परंपरा आदर्शवत असल्याची भावना समाप्ती सोहळ्यात बोलताना आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी व्यक्त केले . कारला येथे श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती मंगळवारी ह.भ.प. अशोक महाराज तळणीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली आहे.या सप्ताह समाप्ती सोहळ्यास आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी भेट दिली त्यांचा श्री कृष्ण मंदिर कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कोहळीकर निवडून आल्यानंतर कारला गावाला पहिली भेट दिली आहे. सत्कार प्रसंगी बोलताना कोहळीकर म्हणाले क...
Shri Guru Gobind Singh ji : श्री गुरु गोविंद सिंघ जी यांचे विचार हेच विश्व बंधूभावचे मुळ आधार – NNL

Shri Guru Gobind Singh ji : श्री गुरु गोविंद सिंघ जी यांचे विचार हेच विश्व बंधूभावचे मुळ आधार – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड येथे साहिब श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या प्रकाश गुरुपुरब निमित्त 'विशेष किर्तन दरबार' आयोजित करण्यात आले. गुरु महाराजांचे जीवन व त्यांनी दिलेली शिकवण जगातील लोकांमध्ये बंधूभाव व समानता राखण्यासाठी पुरक ठरेल देश-परदेशातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुरुद्वारा प्रशासनातर्फे महाराजा रणजीत सिंघ जी यात्री निवास कंपाऊड मध्ये सर्व सोयी सुविधा युक्त नविन भक्त निवास ची उभारणी केली जाणार आहे. ज्याचे काम प्रगती पथावर आहे. येणाऱ्या भाविकांसाठी गुरुद्वारा बोडां तर्फे २४ तास लंगर प्रसादची सेवा करण्यात येते. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे फ्री-बस सेवा रेल्वे स्टेशन आणि विमानतळ ते गुरुद्वारा साहिब पर्यंत करण्यात आलेली आहे, गुरुद्वारा सचखंड बोर्ड तर्फे संचलित दशमेश हॉस्पीटल मध्ये ओ. पी. डी. सोबतच डायलेसीस चे उपक्रम यशस्वीरीत्या...
Guru Shri Govindsingh Ji : गुरु श्री गोविंदसिंघ जी यांना नमन करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो -NNL

Guru Shri Govindsingh Ji : गुरु श्री गोविंदसिंघ जी यांना नमन करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| सिख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज यांना नमन करताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे त्यांचे महान कार्य आहे असे प्रतिपादन नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी की केले. येथील प्रियदर्शनी शैक्षनिक संकुलात श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. जयंतनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,सरदार महेंद्रसिंघ पैदल,धनंजय उमरीकर,श्रेयस कुमार बोकारे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रियदर्शनी शैक्षनिक संकुल चे अध्यक्ष बालासाब मादसवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रियदर्शनी शैक्षनिक संकुलातील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रारंभी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री ...
Parshwanath Mahadev Yatra : श्री पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्ताने सोमवारी हजारो भाविक भक्तांची झाली गर्दी -NNL

Parshwanath Mahadev Yatra : श्री पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्ताने सोमवारी हजारो भाविक भक्तांची झाली गर्दी -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर| तालुक्यातील सवना ज. जिरोणा, रमणवाडी, गणेशवाडी, महादापुर, दगडवाडी, चिचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डी ज, पिछोडी भागाला जोडणाऱ्या पाचशिव महादेव फाटा येथील श्री पार्श्वनाथ महादेव मंदिराच्या यात्रे निमित्ताने सोमवारी हजारो भाविक भक्तानी उपस्थित होऊन दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रतिवर्षीच्या परंपरेनुसार जानेवारी महिन्यांतील पहिल्या सोमवारी पार्श्वनाथ मंदिराची यात्रा भरविली जाते. यंदा हि यात्रेला दिनांक ०५ पासून सुरुवात झाली असून, यात्रेत सोमवारच्या दिवशी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून भगवान पार्श्वनाथ महादेवाचे दर्शन घेतले. तसेच मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रसादाचा लाभ महिला- पुरुष नागरिकांनी घेतला. यात्रेमध्ये थाटण्यात आलेल्या विविध प्रकारच्या दुकानावर साहित्य खरेदीसाठी महिला पुरुषांनी गर्दी केली होती. यात्रा भरविल्या जाणाऱ्या परिसरात अठरा पगड जातीचे लोक एकत्र...
H.B.P. Krishna Maharaj Bompilwar ; दुर्जुनाच्या संगतीपेक्षा सज्जनांच्या संगतीत राहिल्यास जिवनाचा मार्ग सुखकर होईल – ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार – NNL

H.B.P. Krishna Maharaj Bompilwar ; दुर्जुनाच्या संगतीपेक्षा सज्जनांच्या संगतीत राहिल्यास जिवनाचा मार्ग सुखकर होईल – ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर l दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता. म्हणून यावर उपाय एकच आहे. सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे. सत्संग सदा घडायला हवा. म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे म्हणून दुर्जनाच्या संगतीपेक्षा सज्जनांच्या संगतीत राहिल्यास जिवनाचा मार्ग सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन ह.भ.प.कृष्णा महाराज यांनी केले आहे. कारला येथील श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सायंकाळची किर्तन सेवा ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार यांची झाली आहे.या किर्तन प्रसंगी बोलताना म...
Rigveda Dasagrantha Samhita Padakrama begins recitation : ऋग्वेद दशग्रंथ संहिता पदक्रम पारायणास प्रारंभ; देशभरातील वैदिक सहभागी -NNL

Rigveda Dasagrantha Samhita Padakrama begins recitation : ऋग्वेद दशग्रंथ संहिता पदक्रम पारायणास प्रारंभ; देशभरातील वैदिक सहभागी -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान ‘रौप्य महोत्सव’ निमित्ताने आयोजित ऋग्वेदांचे दशग्रंथ षडंगसहित संहिता पदक्रम पारायणास आज (बुधवार, ता.2 जानेवारी 2025) देशातील नामांकित घनपाठी वैदिकांच्या उपस्थितीत विधिवत सुरुवात झाली. श्रीदाजी महाराज संस्थान,श्रीगंगाजीबापू गो सेवा प्रकल्प, सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान व श्रीदाजी महाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने दि.2 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, विविध स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत. भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची भागवत कथा,प्रसिद्ध कीर्तनकारांचा नाम संकीर्तन सप्ताह, विविध क्षेत्रीय कर्तृत्ववानांचा कार्य गौरव इत...
Shri Parameshwara Temple : हिमायतनगर श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा नियोजन बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न – NNL

Shri Parameshwara Temple : हिमायतनगर श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा नियोजन बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न – NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा - वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या 2025 ची महाशिवरात्री यात्रा महोत्सव नियोजन संदर्भात दि.02 जानेवारी गुरुवारी दुपारी 2 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली. बैठकीत सर्वानुमते यात्रा सब कमिटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण तर सचिवपदी अनिल भोरे यांची निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवकांच्या पुढाकारातून श्री परमेश्वराची यात्रा हर्षोल्हासात साजरी होणार आहे. सबंध भारतात एकमेव उभी श्री परमेश्वर मूर्ती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहरात आहे. त्यामुळे राज्यभरातून तसेच विदर्भ - मराठवाडा- तेलंगणा - आंध्रप्रदेश - कर्नाटक राज्यातुन लाखो भाविक भक्त महाशिवरात्री निमित्ताने श्री परमेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर (वाढोण्याच्या) श...
Lakhs of devotees take darshan of Sri Ambabai : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लाखो भाविकांनी घेतले कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन -NNL

Lakhs of devotees take darshan of Sri Ambabai : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लाखो भाविकांनी घेतले कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन -NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
कोल्हापूर| बुधवार पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक भाविक भक्त ठिक ठिकाणी देव दर्शनाला जात असतात, याच पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठ पैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर येणार नवीन वर्ष सुख समृद्धी व आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना करत अंबाबाई च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठया रांगा लाऊन मंदिरामध्ये गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्‍ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेशसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. नवरात्रोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात. सध्या वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी ह...
error: Content is protected !!