हिमायतनगर| अखंड हरिनाम सप्ताह च्या माध्यमातून आजची नवतरुण पिढी सांप्रदायाकडे जात आहे. कारला गावात श्री कृष्ण मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. गोपाळ मंडळीसह ग्रामस्थांनी हि परंपरा जोपासण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. हि परंपरा कायम सुरू ठेवल्यास भविष्यातील पिढी सुधारल्यासिवाय राहणार नाही. गावची हि परंपरा आदर्शवत असल्याची भावना समाप्ती सोहळ्यात बोलताना आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी व्यक्त केले .
कारला येथे श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती मंगळवारी ह.भ.प. अशोक महाराज तळणीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली आहे.या सप्ताह समाप्ती सोहळ्यास आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी भेट दिली त्यांचा श्री कृष्ण मंदिर कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कोहळीकर निवडून आल्यानंतर कारला गावाला पहिली भेट दिली आहे. सत्कार प्रसंगी बोलताना कोहळीकर म्हणाले की, कारला गाव सांप्रदायिक असुन गेल्या पंधरा वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहाच्या माध्यमातून गावातील तरुण पिढी सांप्रदायाकडे वळत आहे. हे गावांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. या सप्ताहातुन येणारी पिढी चांगली आणि सांप्रदायिक निर्माण होणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी बबनराव कदम, शिवाजी कदम, विजय पाटील वळशे, विकास पाटील देवसरक, संतोष पाटील, गजानन हारडपकर, मारोती पाटील लुम्दे, केशव रासमवाड,राजेश ढाणके, बाळू रासमवाड, परमेश्वर इटेवाड,रामराव लुम्दे, अशोक बोंपीलवार,संजय इटेवाड, नाथा गुंफलवाड, लक्ष्मण ढाणके,शाम लुम्दे,नाना ढाणके ,कृष्णा लुम्दे, जांबुवंत मिराशे, यांच्यासह भक्त मंडळी ग्रामस्थांची उपस्थित होते.