किनवट, परमेश्वर पेशवे| कै प्रल्हादरावजी गरुड माध्यमिक विद्यालय इस्लापूर सदरील विद्यालयाची शैक्षणिक सहल दिनांक 01/01/2025 ते 06/01/2025 दरम्यान सदरील विद्यालयाची शैक्षणिक सहल संस्थेचे संस्थाचालक संदीपजी गरुड यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली होती.
गरुड माध्यमिक विद्यालय नेहमीच सर्व दूर सहल नेहण्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञानच पुरेसे नाही तर बाहेरील जगाशी प्रत्यक्ष भेटून घेतलेले ज्ञान देखील खूप महत्त्वपूर्ण असते असा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच अशा सहलीचे नियोजन केले जाते. सदरील विद्यालयाने या वर्षीची शैक्षणिक सहल, ऐतिहासीक ,धार्मिक तसेच विविध नैसर्गिक पर्यटण स्थळे ई.ठिकाणी भेटी देवून या अविस्मरणीय केली.
या भेटीमध्ये औंढा नागनाथ, औरंगाबाद, घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारोती मंदिर, वेरुळ लेण्या, शिर्डी साईबाबा दर्शन, ओझर गणपती,लेण्यांद्री गणपती, शिवणेरी किल्ला, भिमाशंकर, आळंदी, प्रतिबालाजी मंदिर, जेजूरी खंडोबा,मोरगाव गणपती, पंढरपूर, सिद्धेश्वर सोलापुर, तुळजापुर देवी ईत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. सहलीचे नियोजन मुख्याध्यापक श्री जाधव एस बी, श्री.वायाळ आर एस व श्री काळे एस एच सेवक पोहेकर बी डी यांनी केले.