किनवट, परमेश्वर पेशवे| जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नालाही प्रत्यक्षात उतरवता येते याचे ताजे उदाहरण सोपान सुभाष राठोड या मुलाने नागपूर येथील युनिव्हर्सिटी मध्ये डी फार्मसी बी फार्मसी ही पदविका मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात औषध निर्माता अधिकारी म्हणून शासकीय नोकरी मिळून आई-वडिलांचे स्वप्न अखेर पूर्ण केले. असता गावातील नागरिकांनी सोपान सुभाष राठोड यांचे गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
किनवट आदिवासी बहुल भागातील रोडा नाईक तांडा येथील शेतकरी सुभाष राठोड यांची परिस्थिती हालाखीची असताना देखील सुभाष राठोड यांनी आपल्या पत्नीसह परिस्थितीवर मात करत आणि शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आई-वडिलांनी पोटाला पीळ देत पई, पई जमा करून मुलाच्या शिक्षणासाठी पैसा लावला आणि शासकीय नोकरीचे स्वन पाहीले आई-वडिलांच्या स्वनाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सोपान सुभाष राठोड या मुलांनी रात्र, दिवस मेहनत करत नागपूर येथील युनिव्हर्सिटी मध्ये बी फार्मसी चे शिक्षण पूर्ण करून अखेर औषध निर्माता अधिकाऱ्याची सिंधुदुर्ग येथे पोस्ट मिळवत आई-वडिलांचे शासकीय नोकरीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवल्याने रोडा नाईक तांडा येथील नागरिकांनी सोपान सुभाष राठोड या मुलाचे भव्य स्वागत केले.
या प्रसंगी ईस्लापूर येथील व्यापारी प्रमोद पल्लीकोंडावार, राजू जाधव, कॉ.अर्जुन आडे,शंकर जाधव, शिवराम जाधव, पत्रकार गौतम कांबळे, ईश्वर जाधव, गणेश जयस्वाल,सरपंच प्रकाश राठोड, बाळु आय.आर. बी, मुख्याध्यापक सुग्रीव केंद्रे, दिनेश राठोड, उत्तम पंतु, निर्गुण कदम यांनी देखील उपस्थिती दर्शवीत सोपान राठोड यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे. या सत्कार सोहळ्यास गावकऱ्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.