Thursday, May 14

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shrikshetra Mahurgad  : भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीने बहरले श्रीक्षेत्र माहूरगड; शनिवार,रविवारसह नाताळ सुटीमुळे भाविकांची मादियाळी -NNL

Shrikshetra Mahurgad : भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीने बहरले श्रीक्षेत्र माहूरगड; शनिवार,रविवारसह नाताळ सुटीमुळे भाविकांची मादियाळी -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठ पैकी पुर्ण व मुळ पिठ असलेले गडावरील रेणुका मातेचे मंदिर,सती अनुसूया माता मंदिर.श्री दत्त शिखर. दत्त प्रभुचे निद्रास्थांन, देवदेवेश्वर.बाबा सोनापीर, पांडव लेणी.शे.फ.वझरा धबधबा. मात्रुतिर्थ .कैलास टेकडी,रामगढ किल्ला.यासह निसर्ग रम्य डोगर द-या,चे ठिकाण असलेल्या माहूरगड भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत. आठवडाभरांपासून शनिवार, रविवार शासकीय सुट्टी व नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर भाविक व पर्यटकांनी फुलून गेलेली असल्याचे पहावयास मिळत आहे. हा भाविकांचा ओघ नववर्षा आरंभ दिनापर्यंत असाच राहणार आहे. कर्नाटक तेलंगाना सह राज्यभरातून पर्यटक व भाविक भक्त तथा शैक्षणिक सहलीतून आलेल्या विद्यार्थ्यांची माहूर नगरीत प्रचंड गर्दी होत आहे. नाताळ सुट्टीतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर. सध्या दररोज हजारों भाविक दर्शनार्थ येत असल्या...
Krishna Temple ; कारला येथे कृष्णा मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन -NNL

Krishna Temple ; कारला येथे कृष्णा मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर। कारला येथे श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रारंभ पौष शुध्द ०१ दि.३१/१२/२०२४ रोज मंगळवार पासून होणार असुन सात दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह चालणार आहे या भक्तीमय सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे . हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील श्री कृष्ण मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे यंदाही या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला दि.31 डिसेंबर पासून प्रारंभ होणार असुन 7 जानेवारी रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिन कार्यक्रम काकडा सकाळी ५ ते ६, ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ७ ते १०, हरिपाठ सायंकाळी ४.३० ते ६ ,हरिकिर्तन • रात्री ८ ते १०.३० असे असणार आहे या सप्ताहतील किर्तनकार ह.भ.प. नामदेव महाराज ताङकुले वडगा...
Yalkot Yalkot Jayamalhar : यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्यापासून माळेगावच्या यात्रेला प्रारंभ; 29 डिसेंबर देवस्वारी व पालखी पूजन – NNL

Yalkot Yalkot Jayamalhar : यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्यापासून माळेगावच्या यात्रेला प्रारंभ; 29 डिसेंबर देवस्वारी व पालखी पूजन – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| उद्या 29 डिसेंबर रोजी माळेगाव येथे स्थानिक देवस्थानच्यावतीने तिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. या सोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारल्या असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची प्रसाधन गृहाची, स्वच्छतेची आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांसाठी सुविधा संपर्क केंद्र ही उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा व स्थानिक ग्रामपंचायत माळेगावचे कर्मचारी या काळात यात्रेमध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्धतेची खातरजमा करतील, गावकऱ्यांच्या मदतीने यात्रेकरूंना उत्तम सोयी सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न करतील अशा पद्धतीचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत. या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यावेळी य...
A special train will run from Nanded  : 22 जानेवारी 2025 रोजी नांदेडहून महाकुंभ मेळाला विशेष रेल्वे जाणार -NNL

A special train will run from Nanded : 22 जानेवारी 2025 रोजी नांदेडहून महाकुंभ मेळाला विशेष रेल्वे जाणार -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
नांदेड| प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळाला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड विशेष रेल्वे प्रयागराज चौकी आणि काचीगुड-पटणा-काचीगुडा नांदेड आणि प्रयागराज चौकी मार्गे चालविण्यात येत आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे. गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहो...
Mla Baburao Kadam Kohalikar ; गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा व लमानी आई मंदिरास भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतले दर्शन -NNL

Mla Baburao Kadam Kohalikar ; गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा व लमानी आई मंदिरास भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतले दर्शन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड, अनिल मादसवार। हदगाव तालुक्यातील मौजे गोरलेगाव येथील माता लमानी आई देवस्थान आणि गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांनी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले, आगामी काळात गावाला जाण्याचा रस्ता व मंदिर सभागृह बांधकाम भूमिपूजन 20 लाखाच्या निधीतून होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. मागील सात दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नदीकाठी असलेल्या मौजे गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होता. आज दिनांक 27 रोजी या सप्ताह सोहळ्याची सांगता असल्यामुळे याच कार्यक्रमांमध्ये येथील लमानी आई मंदिराच्या सभागृहासाठी 20 लाखाच्या निधी मंजूर करून दिल्याने त्या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा गावकऱ्यांच्या वतीने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला होता. ...
Malegaon yatra 2 january ; राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून -NNL

Malegaon yatra 2 january ; राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड। भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी ( दोन्ही दिवस पकडून )सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम २ जानेवारीपासून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे. माजी प्रधानमंत्री यांचा दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर 2 जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते. पालखी २९ डिसेंबरलाच - त...
Pandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा नोव्हेंबर २०२६ मध्ये -NNL

Pandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा नोव्हेंबर २०२६ मध्ये -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा ऐकण्याची नांदेडकरांना पुन्हा एकदा संधी मिळणार असून, दि. १९ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यानची तारीख नांदेडसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेच्या गर्दीचे नवीन नवीन विक्रम होत आहेत. या आठवड्यात दुबई येथे झालेल्या कथेला अनिवासी भारतीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.सप्टेंबर महिन्यात नांदेड येथे झालेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेसाठी पाच लाख पेक्षा जास्त जनसागर जमला होता. दोन दिवस पाऊस पडल्यामुळे कथेमध्ये व्यत्यय आला होता. तेव्हापासून दिलीप ठाकूर हे नांदेड येथे आणखी एकदा आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु वर्ष २०२९ पर्यंतच्या सर्व तारखा आधीच आरक्षित झालेल्या होत्या. दिलीप ठाकूर हे स्वतः दोन वेळा सिहोर येथे कथेच्या आ...
Shri Hanuman idol Pranpratistha : वंजारवाडी येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन सोहळा उत्साहात संपन्न -NNL

Shri Hanuman idol Pranpratistha : वंजारवाडी येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन सोहळा उत्साहात संपन्न -NNL

धार्मिक, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट येथून पुर्वेस सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे वंजारवाडी येथे नूतन मंदिर बांधकाम पूर्ण झाले असून श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ह.म.प. नारायण महाराज वैष्णव सदन माधापुरकर यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांनी स्वखर्चातून मेहनत व चिकाटीने भव्यदिव्य असे श्री हनुमान मंदिर उभे केले. येथील मंदिरात श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण चा कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी ह.भ.प. बालयोगी श्री गंगेश्वर महाराज सोमेश्वर संस्थान मदनापूर, शनिवार पेठ यांच्या शुभहस्ते हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटांनी संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी सात वाजता कळस नगर प्रदक्षिणा व दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती. या महोत्सवासाठी गावातील लेकबाळींनी मोलाचे योगदान दिले, म्हणून गावकऱ्यांच्या वतीने या सर्व लेकबाळी...
Shahapur Yatre’s prompt response : शहापुर यात्रे’स उस्फुर्त प्रतिसाद -NNL

Shahapur Yatre’s prompt response : शहापुर यात्रे’स उस्फुर्त प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड
देगलूर| तालुक्यातील शहापुर येथील विठ्ठल- रूक्माई मंदिराच्या वार्षिक उत्सव अंतर्गत मोठी यात्रा पार पडते हि यात्रा 24 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत असते यात्रेच्या अनुषंगाने लोहा व पुसद सह आधी ठिकाणचे नाट्य मंडळे यात्रेत आवर्जून सहभागी होत असतात तब्बल दहा हजार हून अधिक यात्रेकरूची यात्रेत ये- जा असते येथे 17 डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले असून, सप्ताहाचा कालावधीत अनेक संत मंडळीचे किर्तन विषयक कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचे दिसून आले. या सप्ताहाची सांगता 24 डिसेंबर रोजी ह. भ. प. एकनाथ महाराज पाळेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल तेव्हा या हरिनाम सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावेत असे आवाहन विठ्ठल- रूक्माई मंदिर अध्यक्ष गंगा रेड्डी कोटगीरे, माजी जि. प. सदस्य शिवाजी कनकंटे , जिल्हा मजूर फेडरेशन तालुका संचालक रामलुरेड्डी ईलतेपवार, मल्लन रेड्डी चिंतलवार, राजेंद्र दंडोड, मल रे...
Parmeshwar Temple ; वाढोण्याच्या श्री परमेश्वर मूर्तीच्या कमानीला नक्षीदार चांदीची झळाळी; सौंदर्यात पडली भर -NNL

Parmeshwar Temple ; वाढोण्याच्या श्री परमेश्वर मूर्तीच्या कमानीला नक्षीदार चांदीची झळाळी; सौंदर्यात पडली भर -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। संबंध भारतात श्री परमेश्वराची एकमेव उभी मुर्ती असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या मुर्तीच्या कामानीला अंदाजे ५० किलोची चांदीची झळाळी लावण्यात आली आहे. यामुळे श्री परमेश्वर मंदिराच्या वैभवात भर पडली असून, मंदिराच्या विकास कामाची घौड दौड अविरत चालू असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तातुन परमेश्वर मंदिर कमिटीच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केल जात आहे. गेली अनेक वर्षपासून श्री परमेश्वर मंदिराचा विकासात्मक आलेख आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी पदसिद्ध अध्यक्ष, सर्व संचालकांना विश्वासात घेऊन मंदिर परिसरात शेकडो व्यापारी गाळे उभारली आहेत. श्री परमेश्वर मंगल कार्यालय, नाममात्र दरात भक्त निवास उभारले आहे. ही कामे यशस्वी झाल्यानंतर ट्रस्ट क...
error: Content is protected !!