नांदेड, अनिल मादसवार। हदगाव तालुक्यातील मौजे गोरलेगाव येथील माता लमानी आई देवस्थान आणि गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांनी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले, आगामी काळात गावाला जाण्याचा रस्ता व मंदिर सभागृह बांधकाम भूमिपूजन 20 लाखाच्या निधीतून होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
मागील सात दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नदीकाठी असलेल्या मौजे गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होता. आज दिनांक 27 रोजी या सप्ताह सोहळ्याची सांगता असल्यामुळे याच कार्यक्रमांमध्ये येथील लमानी आई मंदिराच्या सभागृहासाठी 20 लाखाच्या निधी मंजूर करून दिल्याने त्या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा गावकऱ्यांच्या वतीने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला होता.
त्यानिमित्ताने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शुक्रवारी दुपारी गोरलेगाव येथे भेट देऊन लमानी आईचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरी व भागवत ग्रंथाचे दर्शन घेतले. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच निधन झाले असल्यामुळे येथील मंदिराच्या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा व अन्य शासकीय कार्यक्रम रद्द करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना याठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच कार्यक्रमांमध्ये सप्ताहात गावकऱ्यांना भक्तीचा मार्ग दाखविणारे हभप. भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज यांचा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित गावकरी नागरिक, मंदिर कमेटी, भागवत सप्ताह समिती व अनेकांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना शुभेच्छा दिल्या.
नागरिकांच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी गावकऱ्यांनी अतिवृष्टी मध्ये गावाला पुराचा वेढा पडतो, यासाठी हदगाव ते गोरलेगाव पर्यंत रस्त्याला मंजुरी देऊन गावाची प्रमुख अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, येथील 650 हेक्टर उसाची वाहतूक रस्त्यामुळे अडचणीची झाली आहे, त्याच बरोबरच गावाच्या विकासासाठी आणि मंदिर सभागृहाला कमी पडणारा निधी वाढून देण्याची मागणी केली. गावकाऱ्यांच्या सर्व मागण्या त्यात प्रामुख्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या काळात या रस्त्याला प्राधान्य दिले जाईल, ज्या मागण्या केल्या त्या सर्व पूर्ण करण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित गावकऱ्याना दिले. यावेळी अनिल पाटील बाभळीकर, गौतम पिंचा, संभाराव लांडगे मामा, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील प्रमुख नागरिक, पत्रकार व मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यानंद जाधव पाटील वाटेगावकर यांनी केले.
निराधार महिलां व लाडक्या बहिणीनी घेतली आमदारांची भेट