Wednesday, May 13

District President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा – जिल्हाध्यक्ष रावनगांवकर

हिमायतनगर,अनिल मादसवार| आगामी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलांने काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांनी केले. ते हिमायतनगर येथील महात्मा फूले सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ( अजितदादा गट) महत्वपूर्ण बैठकीत बोलत होते.

नुकतीच हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ( अजितदादा गट) महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांनी पक्षवाढी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना रावनगांवकर म्हणाले की, गाव तिथं राष्ट्रवादी व घर तिथे कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. त्याचबरोबर आगामी निवडणूक लक्षात घेऊन एका बुथवर किमान १०० सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, आणि पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

FB IMG 1745159551599 District President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा - जिल्हाध्यक्ष रावनगांवकर

या प्रसंगी संविधान वाचन करण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बनविण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे स्टीकर ज्यामध्ये भारतीय संविधान व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा फोटो आहे. व तसेच आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक या पत्रकाचे विमोचन श्री रावनगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालूकाअध्यक्ष अभिषेक लूटे यांनी केले.

प्रास्ताविकांत लूटे म्हणाले की, जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष रावनगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पवार व पक्षांची विचारधारा घराघरांत पोहोचविण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करीत राहणार असल्याचे अभिषेक लूटे यांनी सांगितले.

FB IMG 1745159540564 District President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा - जिल्हाध्यक्ष रावनगांवकर

यावेळी युवा जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील इंगळे, माजी सभापती सुरेश बिल्लेवाड, जिल्हा चिटणीस प्रविण घूले, शिवाजी पाटील लगळूदकर, परसराम पाटील, आनंदराव ढवळे, सखाराम वाघमारे, एकनाथ पाटील, सुमित भरणे,पवन डोंगरे, दिगंबर नाईक आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!