HomeकृषीCrop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत :...

Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतक-यांनी पिक वीमा योजनेचा लाभ घ्यावा

मुंबई| “राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ वरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली” असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार कोकण विभागातून १,०२,३३५, नाशिक विभागातून ३,३३,३८५, पुणे विभागातून ६,०७,६६३, कोल्हापूर विभागातून २,४०,२५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३,२५,०००, लातूर विभागातून २,४२,८२६, अमरावती विभागातून ६,९१,९७३ आणि नागपूर विभागातून ४,५३,३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. एकूण ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून, मराठवाडा विभागातून सर्वाधिक तर कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारी दिसून येते.

“पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी”, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची ठाम भूमिका आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अर्ज करता आलेला नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत कोणताही विलंब न करता १० ऑगस्टपूर्वी पीक विम्यासाठी अर्ज करावा.”

“प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट तसेच हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करत असून, सर्व शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ अर्ज करावा,” असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PMFBY Crop Insurance App डाउनलोड करावा किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments