Agristak Farmer Identity : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य
नांदेड| प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- ४०० ०५९ ई-मेल : pikvima@aicofindia.com या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा (Agristak Farmer Identity Card Number Mandatory for Pradhan Mantri Crop Insurance Scheme) योजनेत 31 जुलै 2025 पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
ही योजना नांदेड जिल्ह्यातील अधिसूचित केलेल्या ज्वारी, मुग, उडीद, तूर, सोयबीन व कापूस या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. प्रधानमंत्री पीक विमा ...
