Thursday, May 14

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय -NNL

धार्मिक, मराठवाडा
मुंबई| मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे 60 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला होता. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमीनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड येथील मंदिराच्या शासकीय महापूजेबाबतच्या निवेदनाची शासनाने घेतली दखल -NNL

तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड येथील मंदिराच्या शासकीय महापूजेबाबतच्या निवेदनाची शासनाने घेतली दखल -NNL

नांदेड, धार्मिक
नविन नांदेड| जगभरातील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत, महाराष्ट्रातील संत गुरु रोहिदास महाराज मंदिर प्रस्तावित ग्रामीण तिर्थक्षेत्र वर्ग ब बळीरामपूर नांदेड या 40 वर्षापूर्वीच्या मंदिराची महापूजा दरवर्षी माघ पौर्णिमेस जयंतीनिमित्ताने व पुढच्या वेळेस 12 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार शासनाच्या पुढाकाराने एक विशेष बाब म्हणून मा. पालकमंत्री नांदेड, मतदार संघातील मा. आमदार यांच्या शुभहस्ते, मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीमध्ये ठेवण्याची व्यवस्था व्हावी असे निवेदन वेळोवेळी सन 2020 पासून करण्यात येत असताना राज्य शासनाचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांनी सदरील निवेदनाची योग्य ती दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना पुढील उचित कार्यवाहीस्तव कळविले असल्याचे मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी त्यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या कार्यालयाचे पत्र क्रं. 2024/जिनिस/का-3/865 दि. 11.07.2024 अन्...
Chief Minister’s Pilgrimage Scheme | मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतून जेष्ठांना देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी – NNL

Chief Minister’s Pilgrimage Scheme | मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेतून जेष्ठांना देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राज्यातील सर्व धर्मियांमधील जेष्ठ नागरिकांना भारतातील 73 व राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आता शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे पूर्ण करता येणार आहे. जे नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांच्यासाठी भारतातील आणि राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळांच्या यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येइल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन , निवास इ. सर्व बाबींचा समावेश आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे आवश्यक आहे. वय वर्षे 60 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना लाभ घेता येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त न...
Shiva Sadguru Shivlinga Swami Dutt Temple – शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त मंदिर संस्थान पिंपळगावला राज्य सरकारचे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता -NNL

Shiva Sadguru Shivlinga Swami Dutt Temple – शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त मंदिर संस्थान पिंपळगावला राज्य सरकारचे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले, प्रसिद्ध देवस्थान शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी श्री दत्त मंदिर संस्थान पिंपळगाव ता.हदगाव या देवस्थानला राज्य सरकारने ब दर्जाचे तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर केला आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री, तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी सतत पाठपुरावा करत ब दर्जा मंजूर करून घेतला आहे. ब दर्जा तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मंदिराचा, परिसराचा राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणार आहे. परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात मंदिरात येणार्‍या भाविकांना सुख-सुविधा मिळणार आहेत. राज्य सरकारचे व ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांचे परिसरातील भाविकांच्या व नागरिकांच...
All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

All the pilgrims in the 24th Amarnath Yatra are in good health | चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम -NNL

नांदेड, देश विदेश, धार्मिक
नांदेड| चोविसाव्या अमरनाथ यात्रेतील सर्व १०३ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम असून अमरनाथ व वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाल्यामुळे दुसरा जत्था मंगळवार दि. ३० जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सचखंड एक्सप्रेस ने नांदेड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती कटरा येथून आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. १९ जुलै रोजी दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली ९२ यात्रेकरू, ५ टूर मॅनेजर व ६ केटरिंग टीमचे सदस्य नांदेड येथून रवाना झाले होते.पहिल्या ग्रुपमध्ये रत्नामाला व संतोष व पालेकर,सुरेखा व डॉ.उत्तम इंगळे, विजया व डॉ.जीवन पावडे,जयालक्ष्मी व भारत गादेवार, मीनाक्षी व गोविंद नलबळवार, जयश्री व अनिल मुक्कावार,प्रतिभा व विकास गादेवार,सीमा व शंकर गुंडावार,मंगलबाई व पंडितराव माळोदे, अरुणा नळबलवार,आदित्य नलबलवार,सुचिता व विनोद अल्लमपल्लेवार,मुक...
Elders, let’s go to the pilgrimage! ज्येष्ठांनो चला… तीर्थ दर्शनाला ! – NNL

Elders, let’s go to the pilgrimage! ज्येष्ठांनो चला… तीर्थ दर्शनाला ! – NNL

धार्मिक, नांदेड
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींसाठी राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” यासाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट आहे. या योजनेसाठी 60 वर्षावरील नागरिकांनी सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करायचे आहेत. 30 हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे. कशी आहे योजना ? भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा...
लंगर साहिब च्या वतीने ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव; जय्यत तयारी सुरू – NNL

लंगर साहिब च्या वतीने ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव; जय्यत तयारी सुरू – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होणार आहे. या उत्सवा निमित्ताने पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी नांदेड येथे येणार आहेत. उत्सवा ची जय्यत तयारी सुरू झाली असल्याची माहिती लंगर साहिब चे प्रमुख जत्थे दार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी दिली आहे. दि २,३,४ ऑगस्ट २०२४ दरम्यान नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येणार आहे. लंगर साहिबचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होणार आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद ...
Ashadhi Ekadashi Vitthal Rukmai and Shri Parameshwar Darshan | आषाढी निमित्ताने वाढोण्याच्या मंदिरात विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वर दर्शनासाठी सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी – NNL

Ashadhi Ekadashi Vitthal Rukmai and Shri Parameshwar Darshan | आषाढी निमित्ताने वाढोण्याच्या मंदिरात विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वर दर्शनासाठी सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| पाऊस पाणी चांगला पडू दे.. शेतकऱ्यांची घरे धनधान्याने भरू दे... सर्वाना सुख समृद्ध ठेव असे साकडे घालत आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरातील विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वराचं दर्शनासाठी सकाळपासून हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायातील महिलां - पुरुषांसाठी आनंदाची पर्वणी आहे. साक्षात विठू माऊलींचे दर्शन घेऊन जीवन सफल करण्याच्या उद्देशाने लाखो भक्त पंढरपूरला रवाना होतात. आणि देव शयनी एकादशीच्या पावन पर्वावर उपवास धरतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत " पंढरीची वारी " या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील सभागृहात दुपारी 2 ते 4.30 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
Pandharpur Special Train | पंढरपूर येथील आषाढी एकादशीला नांदेड विभागातून विशेष गाड्या धावणार – NNL

Pandharpur Special Train | पंढरपूर येथील आषाढी एकादशीला नांदेड विभागातून विशेष गाड्या धावणार – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| नांदेड रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे आषाढ एकादशीच्या निमित्ताने नांदेड विभागातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या चालवणार आहे. महाराष्ट्रात ‘आषाढ एकादशी’ हा एक महत्त्वाचा सण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यंदा आषाढ एकादशी 17 जुलै रोजी येत आहे. मंदिराजवळील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पवित्र नगरी पंढरपूरकडे जाणार आहेत. त्यानुसार, या यात्रेकरू प्रवाशांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागातील तीन महत्त्वाच्या स्थानकांवरून म्हणजे नगरसोल, अकोला आणि आदिलाबाद येथून विशेष गाड्या चालवणार आहे, या तिन रेल्वे नांदेड विभागातील सर्व स्थानकांवरील प्रवाशांना पंढरपूर ला जाण्याचा उत्तम पर्याय देती...
error: Content is protected !!