Thursday, May 14

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rituals of Shivachaitanya Shivacharya Maharaj : हदगावमध्ये शिवचैतन्य शिवाचार्य महाराजांचे श्रावण महिन्यात अनुष्ठान – NNL

Rituals of Shivachaitanya Shivacharya Maharaj : हदगावमध्ये शिवचैतन्य शिवाचार्य महाराजांचे श्रावण महिन्यात अनुष्ठान – NNL

धार्मिक, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये श्री. महादेव मठ संस्थान, हदगाव येथे नित्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी मठाचे मठाधिपती श्री शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे तृतीय श्रावण मास तपोनुष्ठान आयोजित केले आहे. अकराव्या शतकात श्री.बसवलिंग महास्वामीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला श्री. महादेव मठ परिसरातील सर्व भक्तमंडळी साठी श्रद्धेचे स्थान आहे. याच ठिकाणी बसवलिंग महास्वामी यांची संजीवन समाधी आहे. दोन वर्षांपूर्वी येथील मठाधिपती लिंगैक्य बसवलिंग शिवाचार्य महाराज शिवैक्य झाल्यानंतर येथील गादीवर श्री. ष. ब्र. 108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक झाला. तेव्हापासून महादेव मठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. याही वर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये अकरा दिवसीय तपोअनुष्ठान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याचा प्रारं...
Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

Pilgrimage Kaleshwar Temple : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| नांदेड शहरापासून जवळच असलेल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात श्रावण मास निमित्ताने ५ ऑगस्ट पासून पहिल्या सोमवार निमित्ताने व श्रावण मास निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व दैनंदिन महाप्रसाद आयोजन करण्यात आले असून, दैनंदिन रात्री १ ते ५ महा अभिषेक , संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली असून भाविक भक्तांसाठी विशेष पास व दर्शन सुलभ होण्यासाठी दर्शन रांग यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून दुचाकी व तिन चाकी, चारचाकी वाहनासाठी वाहनतळ व पिण्याच्या पाण्याचा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काळेश्वर मंदिर विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने सुरूवात पहिला सोमवार ५ आगस्ट रोजी असुन, दुसरा १२,तिसरा १९ , चौथ्या २६ व पाचवा सोमवार २ सप्टेंबर रोजी असल्याने व श्रावणात ...
Saint Savata Mali One of the greatest Saints of Varkari Sect : संत सावता माळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत – महावीरचंद श्रीश्रीमाळ – NNL

Saint Savata Mali One of the greatest Saints of Varkari Sect : संत सावता माळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत – महावीरचंद श्रीश्रीमाळ – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| कर्तव्य आणि कर्म हीच खरी ईश्वरसेवा आहे. अशी शिकवण देणारे संत शिरोमणी सावता माळी वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत म्हणून सर्वाना परिचित आहेत. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते... ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले होते असे मी गतवर्षी आपल्या परमेश्वर मंदिरात आयोजित संत चरित्र कथेत ऐकले असल्याचे मत श्री परमेश्वर मंदिर संस्थानाचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दिनांक ०३ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अन्नदानाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मंदिर सभागृहात अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ...
श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन – NNL

श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| श्री हुजूर साहेब नांदेड सिडको साईबाबा नगर बिडी कॉलनी येथी ल साईबाबा मंदिर येथून द 6 ऑगस्ट रोजी शिर्डी कडे प्रस्थान करणार असून या पालखी सोहळ्यास खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आरती व मान्यवरांच्या उपस्थित या पदयात्रेची सुरूवात होणार आहे. दर वर्षी प्रमाणे सलग 13 व्या वर्षी नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पालखी सोहळा सिडको येथून प्रस्थान करणार आहे,या पदयात्रेत जवळपास १०० भाविक भक्त सहभागी होणार असून ही यात्रा ४१७ किलोमीटर आहे,यात पहिल्या दिवशी सिडको ते मरळक, आरळ, परभणी, पाळोदी, पाथरी, आष्टी, पिपरखेडा, घुंगरडे, हदगाव, ऊचेगाव, पैठण, भायेगाव, नेवासा मार्ग शिर्डी २० आगस्ट रोजी ही पदयात्रा पोहचणार आहे. ६ आगस्ट रोजी या पदयात्रा शुभारंभ खासदार अशोकराव चव्हाण ,माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर ,नांदेड भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे. या शुभारंभ सोह...
सरकारने देवस्थानच्या वर्ग २ च्या इनामी जमिनी वर्ग १ मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याच्या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! -NNL

सरकारने देवस्थानच्या वर्ग २ च्या इनामी जमिनी वर्ग १ मध्ये करून कायमस्वरूपी कब्जेदारांच्या मालकी हक्कात देण्याच्या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! -NNL

धार्मिक
मुंबई। मंदिराचे आर्थिक व्यवस्थापन, दिवाबत्ती आणि वार्षिक उत्सव आदी सर्व व्यवस्थित पार पडावे या उदात्त हेतुने राजे-महाराजे यांसह भाविकांनी स्वत:ची जमीन मंदिरांना दान दिली. या ‘वर्ग २’ मध्ये असलेल्या जमीनी कोणालाही विकता येत नाही, असे असतांना मराठवाड्यातील या ‘वर्ग २’ च्या इनामी जमीनी ‘वर्ग १’ मध्ये रूपांतरित करून भोगवाटदार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेणार असल्याचे शासनाने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे. सरकारचा हा प्रस्तावित निर्णय मंदिरांना कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या दुर्बल करणारा असल्याने ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून असा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिला आहे. या संदर्भात कालच मंदिर महासंघाच्य...
There should be no problem for darshan at Shri Parameshwara Mandir | श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचण होणार नाही याची काळजी घ्या – उपविभागीय अविनाश कांबळे – NNL

There should be no problem for darshan at Shri Parameshwara Mandir | श्री परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचण होणार नाही याची काळजी घ्या – उपविभागीय अविनाश कांबळे – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| पवित्र श्रावण महिन्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. हि बाब लक्षात घेता श्री परमेश्वर मंदिरासह परिसराची स्वच्छता आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बंद पडलेले पथदिवे , रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीची कोंडी व महिलांना अडचण होणार नाही या सर्व बाबीवर तातडीने उपाययोजना कराव्यात. यासाठी संबंधित विभागाने विशेष पथक तयार करून विशेष लक्ष द्यावे. अश्या सूचना उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे यांनी दिल्या. ते शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात श्रावण मास उत्सव व यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीस उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर कमिटीच्या संचालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यंदाच्या पवित्र श्रावण महिन्यात आलेले सण उत्सव आणि श्री परमेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पदसिद्ध अध्यक्...
Langar sahib : लंगर साहिबच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिविर व उद्या सालाना बरसीचा उत्सव – NNL

Langar sahib : लंगर साहिबच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिविर व उद्या सालाना बरसीचा उत्सव – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| येथील ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने उद्या ४ ऑगस्ट रोजी नांदेड येथे सालाना बरसी उत्सव होणार आहे. या उत्सवा निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी नांदेड येथे मोफत दन्त चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पंजाब सह देश विदेशातील अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी सालाना बरसी उत्स वात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे डेरेदाखल झाले आहेत. उत्सवा ची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती लंगर साहिब चे प्रमुख जत्थे दार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी दिली. लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येणार आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी स...
Parmeshwar temple meeting : वाढोणा हिमायतनगर येथील तीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिरातील श्रावण मास उत्सव यात्रेनिमित्त प्रशासकीय बैठक आज सकाळी 10.30 वाजता होणार-NNL

Parmeshwar temple meeting : वाढोणा हिमायतनगर येथील तीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिरातील श्रावण मास उत्सव यात्रेनिमित्त प्रशासकीय बैठक आज सकाळी 10.30 वाजता होणार-NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार। उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण महिना 2024 निमित्त श्रीक्षेत्र परमेश्वर मंदीर, हिमायतनगर येथील उत्सव आणि यात्रेबाबत आढावा बैठक प्रशासकीय स्तरावरून प्रथमच दिनांक 02 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता श्री परमेश्वर मंदीर देवस्थान सभागृह, हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.त्यामुळे श्री परमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने मंदिराच्या उत्सवासाठी शासनाने देखरेख व कामकाजाला आज होणाऱ्या बैठकीपासून सुरुवात केली असावी असे वाटते आहे. यंदाच्या पवित्र श्रावण महिन्यात आलेले सण उत्सव आणि श्री परमेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व आनंदाने संपन्न व्हावे यासाठी उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवा...
His Holiness Balayogi Venkataswami Maharaj | ओम नमःशिवाय नामजप यज्ञात सर्वानी सहभागी व्हावं – पपू.बालयोगी व्यंकटस्वामी महाराज – NNL

His Holiness Balayogi Venkataswami Maharaj | ओम नमःशिवाय नामजप यज्ञात सर्वानी सहभागी व्हावं – पपू.बालयोगी व्यंकटस्वामी महाराज – NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| देवाच्या नामस्मरणात अपार शक्ती आहे, त्यामुळे सर्वानी नामस्मरण करून पुण्य प्राप्त करून घ्यावे. यंदा सोमवार पासून श्रावण मासाचा हा विशेष योग ७१ वर्षानंतर आलेला आहे. त्यानिमित्ताने येथिल श्री परमेश्वर मंदिरात दिनांक ०५ ऑगस्टपासून ओम नमःशिवाय नामजप यज्ञाचा आयोजन करण्यात आले आहे. या नामजप यज्ञात पंचक्रोशीतील जास्तीत जास्त महिला पुरुषांनी सहभाग घ्यावा आणि आपले जीवन सफल करून घ्यावे असे आवाहन पपू. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केले. पवित्र श्रावण महिनाभर अखंड शिवनाम ओम नमःशिवाय नाम जप सुरु राहणार असल्याने त्या संदर्भातील चर्चासत्र गुरुवारी दुपारी येथील श्री परमेश्वर मंदीरात संपन्न झाले. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी भेट देऊन प्रथमतः श्री चे दर्शन घेतले. त्यानंतर येथील सभागृहात आयोजित बैठकीस उपस्थिती दर्शविली. यावेळी मंदिर संस्थांनच्या वतीने महाविरचंद श्रीश्रीम...
Amarnath yatra arrived in nanded । अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेला गेलेल्या दुसऱ्या जत्थ्यातील १०३ यात्रेकरूंचे मंगळवारी नांदेडमध्ये आगमन -NNL

Amarnath yatra arrived in nanded । अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेला गेलेल्या दुसऱ्या जत्थ्यातील १०३ यात्रेकरूंचे मंगळवारी नांदेडमध्ये आगमन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड। अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेला गेलेल्या दुसऱ्या जत्थ्यातील १०३ यात्रेकरूंचे मंगळवारी नांदेड येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून अविस्मरणीय यात्रा झाल्याबद्दल सर्व यात्रेकरूंनी ढोल ताशाच्या गजरात भांगडा करत आनंद व्यक्त केला. दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत शेकडो भाविकांना घेऊन २४ वेळा अमरनाथचे तर २७ वेळा अमरनाथचे विक्रमी दर्शन घेतले आहे. नांदेड येथे आल्यानंतर लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजी पाटील, गौरव दंडवते, दिपेश छेडा,राजेशसिंह ठाकूर,संतोष भारती,प्रभुदास वाडेकर, संतोष बच्चेवार यांच्यासह अनेक नातेवाईक व मित्रांनी पुष्पवृष्टी करत बम बम भोले च्या गजरात स्वागत केले.दुसऱ्या जत्थ्यामध्ये ५५ पुरुष व ४८महिलांचा समावेश होता.१९ जुलै रोजी दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांच्या नेतृत्वाखाली ...
error: Content is protected !!